Saturday, May 4, 2024
Homeनगरजिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषद स्तरावर भरती

जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषद स्तरावर भरती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मार्च 2019 मध्ये अर्ज घेतलेल्या परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठीचे भरतीचे वेळापत्रक ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे. या रिक्त जागांसाठी जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा नियोजन मंडळामार्फत भरती होणार आहे. विशेष म्हणजे होणारी भरती ऑनलाईन पध्दतीने संगणक चाचणीनूसार होत आहे.

- Advertisement -

मार्च 2019 भरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गाच्या पद भरतीबाबत राज्य सरकारने 10 मे रोजी सविस्तर आदेश काढलेले आहेत. या आदेशानूसार यापुढे जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर भरतीची प्रक्रिया ही जिल्हा निवड मंडळ यांच्या मार्फत होणार असून या मंडळाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी हे राहणार आहेत. या मंडळात झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य असणार आहे. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या भरतीसाठी पुढील आठवड्यात जिल्हा निवड मंडळाचे गठण करण्यात येणार आहे.

मार्च 2019 व ऑगस्ट 2021 च्या (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरूष), प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक (महिला) आणि औषध निर्माण अधिकारी या संवर्गासाठी येत्या 15 व 16 ऑक्टोबरला ऑनलाईन पध्दतीने परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षेनंतर उत्तर सुची (आन्सर की) तीन दिवसांत खुली करण्यात येणार असून त्यानंतरच्या पाच आठवड्यात निकाल जाहीर करणे, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे व त्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत.

आरोग्य सेवक (पुरूष) 278, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी 3, आरोग्य सेवक (महिला) 585 आणि औषध निर्माण अधिकारी 26 एकूण 892 पदे आहेत. तसेच पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील संवर्ग क मधील कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया पूर्ण केल्यावर उर्वरित विभागातील संर्वग क आणि अन्य रिक्त जागांसाठी राज्य सरकारच्या आदेशानूसार भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या