Wednesday, April 2, 2025
Homeनगरझेडपीच्या आणखी तीन संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

झेडपीच्या आणखी तीन संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आठवडाभराच्या खंडानंतर जिल्हा परिषदेच्या पदभरतीचे तीन दिवसांचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले आहे. या तीन दिवसांत 6 संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. त्यापुढील पदांसाठी मात्र अद्याप वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनमधील पदभरतीसाठी सध्या राज्यभर परीक्षा सुरू आहेत. यातील पहिल्या दोन टप्प्यात 7 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत 14 संवर्गातील पदांसाठी परीक्षा झालेली आहे. पुढील टप्प्यातील 23 ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले होते. यातील 17 ऑक्टोबरपर्यंत पेपर झाले.

परंतु अचानक पुढील परीक्षा रद्द होत असल्याचे कंपनीने कळवल्याने विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. दरम्यान, आता आठवडाभरानंतर कंपनीने तीन दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात 1 नोव्हेंबर रोजी जुनिअर मेकॅनिक, मेकॅनिक व कनिष्ठ आरेखक, 2 नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तर 6 नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) असे पेपर होणार आहेत.

दरम्यान, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक (महिला, पुरूष), कनिष्ठ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), औषध निर्माण अधिकारी या पदांसाठीची परीक्षा आता दिवाळीनंतरच होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षेतील अडथळ्यांची शर्यत काय असल्याचे दिसत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ०२ एप्रिल २०२५ – कचरा व्यवस्थापन अत्यावश्यकच

0
घनकचरा व्यवस्थापन हा चिंतेचा आणि वादविवादाचा विषय बनला आहे. त्यावर ‘कॅग’च्या अहवालानेही शिक्कामोर्तब केले आहे. घनकचरा व्यवस्थापनात स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरल्याचा ठपका कॅगने...