Tuesday, June 16, 2026
HomeनगरAhilyanagar : गट व गण आरक्षणाचे गॅझेट जाहीर

Ahilyanagar : गट व गण आरक्षणाचे गॅझेट जाहीर

अंतिम मतदार याद्या प्रसिध्द || 12 तारखेला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 गट व 14 पंचायत समितीच्या 150 गणांचे अंतिम आरक्षणाची अधिसूचना (गॅझेट) सोमवारी नाशिक विभागीय आयुक्तांनी जाहीर केली. त्यामुळे 13 ऑक्टोबर सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेले गट व गणांचे आरक्षण अंतिम करण्यात आले असून आता थेट निवडणुकीची प्रतीक्षा इच्छूकांना लागली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद गट व गणासाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील अंतिम मतदार याद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रामाणित (प्रसिध्द) करण्यात आल्या आहेत. त्यानंतर या मतदार याद्या मतदान केंद्रनिहाय 12 नाव्हेंबरला प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisement -

मागील महिन्यांत 13 ऑक्टोबरला जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले होते. त्यावर हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अवघ्या 10 हरकती व सूचना आल्या. यात गटावर 6 तर गणावर चार हरकती यांचा समावेश होता. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सुनावणी घेऊन त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे निश्चित करण्यात आलेले आरक्षण पाठविले होते. त्यावर अंतिम सुनावणी झाल्यानंतर सोमवारी अंतिम आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या 75 गटांमध्ये 9 अनुसूचित जाती त्यापैकी 6 महिला, 7 अनुसूचित जमाती त्यापैकी 4 महिला, नागरिकांचा मागसप्रवर्ग 20 जागांपैकी 10 महिलांसाठी, सर्वसाधारण 39 जागांपैकी 19 महिलांसाठी राखीव असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. गट व गणांचे आरक्षण निश्चित करून ते अंतिम करण्यात आल्याने आता सर्वांना निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यानुसार निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...