Wednesday, February 4, 2026
Homeनाशिकजिल्हा परिषद कमर्चाऱ्यांचे आधारवड म. वा. ओंकार यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी...

जिल्हा परिषद कमर्चाऱ्यांचे आधारवड म. वा. ओंकार यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

नाशिक | प्रतिनिधी
राज्यातील सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आधारवड, कर्मचाऱ्यांचे महर्षी आदरणीय म.वा. ओंकार यांचे दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १० वाजता वयाच्या ९४ व्या वर्षी नागपूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये कायमस्वरूपी पोकळी निर्माण झाली आहे.

कर्मचाऱ्यांच्या महर्षींनी १९६२ साली जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर, सर्व संवर्गातील र्जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना एकत्र आणून “महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन” या नावाने मुंबई ट्रेड युनियन अॅक्ट १९२६ अंतर्गत (नोंदणी क्रमांक ४३४०) एक बळकट संघटना उभी केली. या संघटनेच्या झेंड्याखाली सर्वांना एकत्र बांधून राज्यातील सरकारी कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या हक्कांमध्ये फारसा फरक राहू दिला नाही.

- Advertisement -

त्यांच्या परिवारात दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा अत्यंत सौजन्यशील परिवार आहे. त्यांच्या या दुःखात राज्यातील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी असून, त्यांना सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांतर्फे भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बलराज मगर, बाबुराव पुजारवाड, बजरंग संकपाळ, सुनील जानोरकर, विजयकुमार हळदे. तसेच, राज्यातील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी वृंद. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...