Friday, May 3, 2024
Homeनाशिकमहाराष्ट्र सदन कथित घोटाळा; निर्णयाचे जि. प. त पेढे वाटून स्वागत

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा; निर्णयाचे जि. प. त पेढे वाटून स्वागत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी (Maharashtra Sadan Scam) राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Nashik Guardian Minister Chhagan Bhujbal), माजी खासदार समीर भुजबळ (EX MP Sameer Bhujbal) व इतरांची आज सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर जिल्हा परिषदेत (Zilla Parishad Nashik) राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, सदस्यांतर्फे न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला….

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर (Sanjay Bankar) यांनी आपल्या दालनात सर्वांना पेढे भरवत हा जल्लोष केला.यावेळी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते उदय जाधव, सदस्य सिद्धार्थ वनारसे,शिवसेनेचे सदस्य दीपक शिरसाट, कृष्णा पारखे, अतुल टर्ले,किशोर खोंड,नाना पवार,प्रिन्स भल्ला, सोमनाथ खोकले, मनोहर बोचरे, धनंजय जोशी, नारायण अडसरे, नितीन हळदे आदी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ व कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी गेल्या ५ वर्षांपासून लढा सुरू होता. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. भुजबळ साहेब व इतर सर्व या प्रकरणातून निर्दोष सुटतील असा आमचा ठाम विश्वास होता.

तो विश्वास आज न्यायालयाच्या निर्णयांनंतर अधिक पक्का झाला आहे. महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) कथित घोटाळा प्रकरणी न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,अशा भावना यावेळी सभापती संजय बनकर, उपाध्यक्ष डॉ.गायकवाड, सदस्य जाधव व वनारसे यांनी व्यक्त केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या