Sunday, May 26, 2024
Homeनगरझेडपीचे 25 शिपाई झाले कनिष्ठ सहायक

झेडपीचे 25 शिपाई झाले कनिष्ठ सहायक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या अनेक वर्षांपासून शिपाई पदावर सेवा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या 25 परिचरांची अखेर पदोन्नती झाली आहे. त्यामुळे हे शिपाई आता गट ‘ड’मधून गट ‘क’मध्ये पदोन्नत झाले असून त्यांना कनिष्ठ सहायक पदावर संधी मिळाली आहे. सोमवारी जिल्हा परिषद प्रशासनाने या पदोन्नत्या केल्या.

- Advertisement -

2015-16 या कालावधीनंतर सेवा प्रवेश नियमांत सुधारणा झालेली असल्याने 2016 पासून परिचर गट-ड या संवर्गातील कर्मचार्‍यांना कनिष्ठ सहाय्यक गट-क या पदावर पदोन्नती देता आलेली नव्हती. 21 जुलै 2023 रोजीच्या अधिसुचनेनुसार परिचर गट-ड या संवर्गातील 25 कर्मचारी यांना त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार तसेच प्रशासनाच्या सोईनुसार कनिष्ठ सहाय्यक गट-क या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अनेक वर्षांपासून उत्कृष्टपणे कामकाज करणार्‍या या कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवाजेष्ठतेने कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नती देण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्यालयांतर्गत कार्यरत पाच परिचर कर्मचारी यांचा प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार केला. परिचर गट-ड संवर्गातील कर्मचारी संघटनेने पदोन्नती केल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या