Sunday, April 27, 2025
Homeनगरकंत्राटी ग्रामसेवक वगळता झेडपी भरतीचा सर्व विभागाचा निकाल जाहीर

कंत्राटी ग्रामसेवक वगळता झेडपी भरतीचा सर्व विभागाचा निकाल जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद पदभरती 2023 अंतर्गत आरोग्य सेवक महिला व मुख्यसेविका (अंगणवाडी पर्यवेक्षिका) यासह जवळपास सर्वच सर्व संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून आता केवळ कंत्राटी ग्रामसेवक पदाचा निकाल जाहीर होणे बाकी असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

नगर जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गातील 937 पदांच्या नोकरभरतीसाठी परीक्षा झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात 174 पदांचे निकाल जाहीर झाले होते. त्यातील 7 संवर्गातील 43 उमेदवारांना 1 आगस्टला नियुक्ती आदेश देण्यात आले. दरम्यान, बुधवारी (दि. 28), तर गुरूवार (दि. 29) रोजी आरोग्य सेवक (40 टक्के आणि 50 टक्के) या दोन संवर्गा?ा निकाल जाहीर झाला आहे. आता जिल्हा परिषदेच्या 18 संवर्गाचा निकाल जाहीर झाला असून केवळ कंत्राटी ग्रामसेवकांचा निकाल शिल्लक आहे. जाहीर झालेला निकाल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहुल शेळके यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : सटाणा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
सटाणा । प्रतिनिधी Satana पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरासह तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधव व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने जन आक्रोश...