Saturday, July 27, 2024
Homeनगरसवडीनुसार झेडपी भरती परीक्षेचे पुढील वेळापत्रक जाहीर

सवडीनुसार झेडपी भरती परीक्षेचे पुढील वेळापत्रक जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जवळपास एक दशकानंतर जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली. यामुळे इच्छुकांनी भरभरून अर्ज केले. त्यानंतर अडथळ्यांची शर्यत पार करत परीक्षेच्या तारीखही जाहीर झाली. मात्र, दोन महिन्यांपासून कासवगतीने परीक्षेची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी कधी परीक्षा होणार तर कधी पेपरच रद्द अशा गमंतीजमती सुरु असतांना अद्या निम्म्या ही उमेदवारांची परीक्षा झालेली नाही. आरोग्यसेवक, सेविका, कंत्राटी ग्रामसेवक असे सर्वाधिक अर्ज आलेल्या पदांची परीक्षा बाकी आहे. यामुळे जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षेचा गुर्‍हाळ कधी संपणार असा प्रश्न उमेदवारांना सतावू लागला आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी सरळसेवा कोट्यातून भरती घोषित केली. त्यानूसार नगरसह राज्यात जिल्हा परिषदांची 19 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा निवड मंडळामार्फत ही भरती होत आहे. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेने या पदांची जाहिरात 5 ऑगस्ट 2023 ला प्रसिद्ध केली होती. यात जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गांतील 937 पदे भरण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक 727 पदे आरोग्य विभागाची आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उमेदवार या भरतीची वाट पाहत होते. त्यामुळे या भरतीसाठी जिल्ह्यातून 44 हजार 726 अर्ज प्राप्त झाले. अर्ज भरल्यानंतर परीक्षा कधी होणार याची प्रतीक्षा होती. अखेर दोन महिन्यांनी 3 ऑक्टोबरपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. तेव्हापासून अजून ही परीक्षा सुरूच आहे. यात अनेकदा वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले.

अजून या संवर्गाची परीक्षा बाकी

19 पैकी 11 संवर्गांची परीक्षा दोन महिन्यांत कशीबशी संपली आहे. तर तीन संंवर्गांचे वेळापत्रक जाहीर झाले असून ती परीक्षा 18 ते 21 डिसेंबरदरम्यान होणार आहे. मात्र 50 टक्क्यांहून अधिक अर्ज ज्या संवर्गात आहेत त्या आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के हंगामी फवारणी), आरोग्य सेवक (पुरूष इतर 40 टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका अशा पाच संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या