Tuesday, June 25, 2024
Homeनगरराहुरी खुर्दच्या शाळेतील साहित्यांची चोरी

राहुरी खुर्दच्या शाळेतील साहित्यांची चोरी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

राहुरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी खुर्च्या, बेंच व पत्रे असा एकूण 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

मंदा आण्णासाहेब शेळके (वय 55) या राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेजवळील अंगणवाडीत सेविका म्हणून कार्यरत आहेत. 13 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मंदा शेळके या शाळेच्या स्टोअर रूम असलेली खोली बंद करून घरी गेल्या होत्या.

14 जून रोजी सकाळी 8 वाजता त्या शाळेत आल्या. त्यावेळी त्यांना खोलीचे गज कापलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खोलीतील दोन झोके, दोन खुर्च्या, पाच बेंच व पंधरा पत्रे असा एकूण 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले. घटनेनंतर मंदा शेळके यांनी फिर्याद दिली.

त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 643/2023 भादंवि कलम 380, 457 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.

- Advertisment -

ताज्या बातम्या