Tuesday, May 20, 2025
Homeनाशिकजि.प.नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग अखेर खुला

जि.प.नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग अखेर खुला

नाशिक | Nashik

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग अखेर खुला झाला आहे.

तीन महिन्यांपासून प्रशासकीय घोळात अडकलेली निविदा मार्गी लागली असून, सदर कामाचे तांत्रिक लिफाफा सोमवारी (दि.२३) उघडण्यात आला.

अनेक राजकीय, प्रशासकीय हस्तक्षेपामुळे या प्रक्रीयेचा घोळ सुरू होता. मात्र, विरोधकांच्या दबावामुळे वित्तीय लिफाफा उघडत, ठेकेदार निश्चित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेची सद्यस्थितीत असलेली इमारत कामकाजाच्यादृष्टीने अपुरी पडत असल्याने, तत्कालीन अध्यक्षा शीतल सांगळे व बांधकाम सभापती मनिषा पवार यांनी नवीन प्रशासकीय इमारतीसाठी प्रयत्न केले. यात नवीन इमारतीसाठी ५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला.

शासनाने, बीड जिल्हा परिषदेच्या धर्तिवर नाशिक जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या खर्चास मान्यता दिली. यात शासन ७५ टक्के खर्च करणार असून उर्वरीत २५ टक्के खर्च जिल्हा परिषदेला करावा लागणार आहे.

शासनाकडून अनामत रक्कम मिळाल्या शिवाय निविदा काढणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती. मात्र, सत्तातंर झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे झाल्याने तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा पाठपुरावा करत, तांत्रिक अडचण केल्याचा दावा करत मुदत संपण्यापूर्वी अगदी घाईघाईत नवीन प्रशासकीय इमारतींचे भूमिपूजन उरकले.

भूमिपूजनानंतर मार्च महिन्यात बांधकाम विभागाने इमारतीची निविदा प्रसिध्द केली. मात्र, या निविदेला करोनाचा फटका बसल्याने निविदेस मुदतवाढीची नामुष्की ओढविली होती. याच दरम्यान, राज्य शासनाने ६७ टक्के निधीला कात्री लावली.

त्यामुळे इमारतीचे भवितव्य अधातरी झाले होते. परंतू, शासनाने केलेल्या तरतूदीप्रमाणे नवीन प्रशासकीय इमारतीसाठी टोकन निधी खात्यात वर्ग झाला. निधी प्राप्त झाल्याने बांधकाम विभागाने नव्याने निविदा प्रसिध्द करण्यात आली. नवीन प्रशासकीय इमारतींसाठी १० निविदा प्राप्त झाल्यात. यानंतर,निविदेला तांत्रिक अडचण आली.

प्रशासनाकडून ही अडचण दूर करण्यात आली. ही अडचण दूर होत नाहीतोच, राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेप वाढल्याने ही प्रक्रीया रखडल्याची चर्चा होती. त्यामुळे तीन महिन्यांपासून ही प्रक्रीयेचा घोळ सुरू होता. अखेर, हा घोळ मिटल्यानंतर सोमवारी प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात आल्या.

यात कमी दर असलेल्या क्रांती कन्स्ट्रक्शन सदर काम देण्यात आले आहे. यास आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी होईल. ही मंजुरी झाल्यानंतर लवकरत इमारीच्या कामाला सुरूवात होईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

0
नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा...