नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR
येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) उर्वरित सभापती पदाच्या खाते (Chairman post) वाटपासाठी आज विशेष सभेचे (special meeting) आयोजन करण्यात आले होते. या सभेत बांधकाम सभापतीपद (Chairman of Construction) वगळता इतर दोन सभापतीपदांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, सभेनंतर सायंकाळी उशिराने बांधकाम सभापतीपद जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक (Vice President Suhas Naik) यांच्याकडे सोपविण्यात आले तर इतर सभापतींच्या खात्यांमध्येही बदल करण्यात आले.
आज दुपारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत शिक्षण समिती सभापतीपदी गणेश पराडके तर आरोग्य समिती सभापतीपदी हेमलता शितोळे यांची निवड करण्यात आली होती. मात्र बांधकाम समिती सभापती व अर्थ सभापती पदाची निवड करण्यात आली नव्हती. या दोन्ही सभापतींचे खाते वाटप न करता बैठकीचा समारोप करण्यात आला होता.
मात्र, सायंकाळी उशिराने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी प्रेसनोट प्रसिद्धीस दिली. त्यात बांधकाम सभापतीपदासह आरोग्य सभापतीपद जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. गणेश पराडके यांच्याकडे शिक्षणासह अर्थ समिती सभापतीपद देण्यात आले आहे. तर हेमलता शितोळे यांना कृषि व पशुसंवर्धन सभापतीपद देण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विषय सभापतीपदासाठी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी बैठकीत झालेल्या खाते वाटपानंतर सायंकाळी त्यात बदल करत बांधकाम समिती व आरोग्य समिती सभापतीपद जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्याकडे तर शिक्षण व वित्त समिती सभापतीपद गणेश रूपसिंग पराडके, कृषी समिती व पशुसंवर्धन समिती सभापतीपद हेमलता अरूण शितोळे यांच्याकडे सोपविले आहे.