Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजZP Election Result 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ समित्यांसाठी...

ZP Election Result 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ समित्यांसाठी मतमोजणीला सुरूवात; पहिल्या कलांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर

मुंबई | Mumbai

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज (सोमवार)जाहीर होत आहेत. १२ जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी एकूण २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवारी (दि. ०७) रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीसाठी ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. तर राज्यभरात एकूण ६६.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली होती.

- Advertisement -

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा निकाल जाहीर होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ पैकी १०० जागांचा कल हाती आला आहे. यामध्ये भाजप- ३८, शिवसेना शिंदे गट- २२, राष्ट्रवादी अजित पवार गट- १९, काँग्रेस- ११, शिवसेना ठाकरे गट- ६, राष्ट्रवादी शरद पवार गट- ० आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत.

दरम्यान, छ. संभाजीनगरमध्ये मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर अजिंठा गटात शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला विजय मिळाला आहे. या गटातून आयेशा बेगम नासेर हुसेन सय्यद यांचा विजय झाला आहे. तर सांगली जिल्ह्यातील तासगाव पंचायत समितीच्या पेड गणातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे हे विजयी झाले आहेत. याशिवाय खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटात २ आणि खानापूर पंचायत समितीच्या ४ गणामध्ये शिंदे सेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...