Saturday, May 4, 2024
Homeनगरझेडपी कर्मचारी सोसायटीला 7 कोटी 78 लाखांचा नफा

झेडपी कर्मचारी सोसायटीला 7 कोटी 78 लाखांचा नफा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला 2021-2022 या आर्थिक वर्षामध्ये 7 कोटी 78 लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. वेगवेगळ्या हेड खाली 1कोटी 62 लाख, आवश्यक तरतुदी, तसेच कायम निधी वरील व्याजाची रक्कम 3 कोटी 22 लाख 92 हजार वजा जाता अहवाल सालात संस्थेस 2 कोटी 93 लाख 46 हजार 378 रुपये निव्वळ नफा झालेला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन विलास शेळके यांनी दिली. संस्थेची 95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.5) लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ही सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत होणार. या सभेत संचालक मंडळाने सभासदांच्या 31 मार्चच्या शेअर्सवर 10 टक्के लाभांशाची शिफारस केली असून कायम निधी वरील व्याज 9 टक्के देणार आहे. संस्थेने सभासदांची वार्षिक 5 लाखांचा अपघात विमा पॉलीसी घेतलेली आहे. मागील वर्षाप्रमाणे सभासदांचे डिव्हिडंड व व्याजाची रक्कम सभा झाल्यानंतर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याचे व्हाईस चेअरमन काशिनाथ नरोडे यांनी सांगितले.

सभेत विशेष गुणवत्ता प्राप्त सभासदांच्या मुला-मुलीना पारितोषिक वितरण, सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे अशी माहिती संचालक संजय कडूस यांनी दिली. संस्थेचे कामकाज ऑनलाइन पध्द्तीने केले जाते, तातडीचे कर्ज शैक्षणिक कर्ज मोबाईल ऑपद्वारे दिले जाते. सर्व कर्जावर 9 टक्के दर असून भविष्यात अजूनही व्याजदर कमी करण्यात येईल अशी माहिती संचालक अरुण जोर्वेकर यांनी दिली.

सभेला संचालक प्रशांत मोरे, विक्रम ससे, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, ज्योती पवार, सुरेखा महारनूर, मनिषा साळवे, संदिप मुखेकर, सरला कदम, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या