Monday, May 20, 2024
HomeनगरZP Exam : तीन दिवसांचे भरतीचे वेळापत्रक जाहीर

ZP Exam : तीन दिवसांचे भरतीचे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर | प्रतिनिधी

आठवडाभराच्या खंडानंतर जिल्हा परिषदेच्या पदभरतीचे तीन दिवसांचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले आहे. या तीन दिवसांत 6 संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. त्यापुढील पदांसाठी मात्र अद्याप वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनमधील पदभरतीसाठी सध्या राज्यभर परीक्षा सुरू आहेत. यातील पहिच्या दोन टप्प्यात 7 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत 14 संवर्गातील पदांसाठी परीक्षा झालेली आहे. पुढील टप्प्यातील 23 ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले होते. यातील 17 ऑक्टोबरपर्यंत पेपर झाले. परंतु अचानक पुढील परीक्षा रद्द होत असल्याचे कंपनीने कळवल्याने विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, आता आठवडाभरानंतर कंपनीने तीन दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात 1 नोव्हेंबर रोजी जुनिअर मेकॅनिक, मेकॅनिक व कनिष्ठ आरेखक, 2 नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तर 6 नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) असे पेपर होणार आहेत.

दरम्यान, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक (महिला, पुरूष), कनिष्ठ साहायक, स्थापत्र अभियांत्रिकी साहायक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), औषध निर्माण अधिकारी या पदांसाठीची परीक्षा आता दिवाळीनंतरच होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षेतील अडथळ्यांची शर्यत कायमी असल्याचे दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या