Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजि.प.तील गटविकास अधिकारी करोना पॉझिटिव्ह

जि.प.तील गटविकास अधिकारी करोना पॉझिटिव्ह

नाशिक जिल्ह्यातील भाजप आमदार करोना पाॅझिटिव्ह

नाशिक । Nashik

- Advertisement -

जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, पशुसवंर्धन विभागातील लिपीक, परिचर सेवकांना करोनाची लागण झालेली असून मुख्यालयातील एका विभागप्रमुखालाही करोनाची लागण झाली आहे. नरेगा कक्षाचे गटविकास अधिकारी (बीडीओं) यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नरेगा कक्षातील सेवकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यास करोनाची लागण झाल्याने जिल्हा परिषद सेवकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शहरासह ग्रामीण जिल्हयात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असताना, मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतही करोनाने शिरकाव केला होता. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील परिचर, सेवकांस करोनाची लागण झाली होती. त्यानंतर कृषी विभागातील लिपीकास तर, पशुसवंर्धन विभागातील सेवकास करोनाची लागण झाली होती. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, मुख्यालयातील सुरक्षा वाढविण्यात आली होती. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी करण्यात आला होता. येणाऱ्या सेवकांचे प्रवेशव्दारावर स्क्रीन टेस्ट केली जात आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी होऊ नये,यासाठी प्रशासनाने विषय समित्यांच्या सभा, स्थायी तसेच सर्वसाधारण सभा आॅनलाईन घेण्याचे फर्मान काढले आहे. दुसरीकडे, प्रशासनाने कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत करोना आढावा घेत, शिक्षण विभागाने वाजतगाजत कार्यक्रम घेतला. त्यावर सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. असे असतानाच मुख्यालयातील नरेगा कक्षाचे प्रमुख तथा गटविकास अधिकारी यांना करोनाची लागण झाली आहे.

संबंधित बीडीओ यांनी मागील आठवडयात कळवण येथे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामांची पाहणी केली. त्यानंतर, त्यांना थकवा जाणवू लागला. सोमवारी त्यांनी स्वत:ची टेस्ट करून घेतली. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विभागप्रमुखांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सेवकांची धावपळ उडाली. दुपारनंतर विभागातील सेवकांना सात दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच विभागाजवळ प्राथमिक शिक्षण विभाग आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या