धुळे । dhule। प्रतिनिधी
- Advertisement -
जिल्हा परिषदेच्या ( Z.p) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (President, Vice President) निवडीसाठी (election) उद्या दि. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता विशेष सभा (Meeting) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
जिल्हा परिषदेवर भाजपाची एक हाती सत्ता आहे. तरी देखील भाजपाच्या गटनेत्या कुसुम निकम यांनी भाजपाच्या जि.प. सदस्यांना व्हीप जारी केला आहे.
अडीच वर्ष शिरपूर तालुक्यातील बोराडी गटातील डॉ. तुषार रंधे यांची अध्यक्षपदासाठी तर शिंदखेडा गटातील कुसुम कामराज निकम यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यामुळे आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद कोणत्या तालुक्याकडे जाते याकडे लक्ष लागले आहे.