Saturday, May 4, 2024
Homeनगरझेडपीच्या पदाधिकार्‍यांना नवीन वास्तूचे वेध !

झेडपीच्या पदाधिकार्‍यांना नवीन वास्तूचे वेध !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांच्या लालटाकी येथील जागेत सध्या असणारे निवासस्थाने (बंगले) पाडून त्या ठिकाणी नवीन निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हा विषय जिल्हा परिषदेच्या 10 तारखेला होणार्‍या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. यामुळे करोना कहर संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांना नवीन वस्तू मिळणार आहे. यासह या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत अनेक महत्वाचे विषय ठेवण्यात आले असून त्यावर चर्चा होवून या विषया मंजूरी मिळणार की विषय प्रलंबित राहणार याकडे जिल्हा परिषदेच्या वर्तुळाचे लक्ष आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुढील मंगळवारी (दि.10) रोजी जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा होणार आहे. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जि. प. कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या धर्तीवर व्हिडीओ कॅन्फरंसनव्दारे ही सर्वसाधारण सभा पारपडणार आहे. या सभेची विषय पत्रिका आणि अजेंडा तयार झाला आहे.

सभेत 20 ते 22 प्रश्‍न असून यात प्रामुख्याने जिल्ह्यातील 64 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांवर कंत्राटीवाहन चालकांना नेमणुका देण्यासाठी प्राप्त निविदेला मंजूरी देणे, कृषी विभागातील अन्य योजनांसह 50 टक्के सेस फंडातील 75 लाख रुपयांच्या कडबाकुट्टीच्या योजनेला मान्यता देणे, यासह लालटाकी येथील पदाधिकार्‍यांच्या नवीन निवासस्थांना घसारानिधीतून बांधकामासाठी निधी मंजूर करण्याचा विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे.

कर्मवीर काळे यांचे स्मृतीस्थळ

जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मवीर माजी खा. शंकरराव काळे यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे. हा विषय विषय पत्रिकेवर मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे. कर्मवारी काळे हे जिल्हा परिषदेचे सलग दहा वर्षे अध्यक्ष होते. यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात त्यांचे स्मृतीस्थळ हे त्यांना अभिवादन ठरणार आहे. यासह जिल्हा परिषदेेचे लिफ्ट (उदवाहन) निर्लेखन करून त्या ठिकाणी मुख्यालयात नवीन लिफ्ट बसविण्याचा विषयही विषय पत्रिकेत आहे.

नवीन सीईंओ क्षिरसागर यांची पहिलीच सभा

जिल्हा परिषदेला नवी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांच्या रुपाने लाभ असून त्यांच्यासाठी ही सर्वसाधारण सभा पहिल्यांदा आहे. जिल्हा परिषदेच्या यापूर्वी होणार्‍या सभेत सत्ताधारी विरोधात विरोधक असा समाना रंगायचा. त्यावेळी प्रशासनावर आरोप होवून सदस्य आक्रमक व्हायचे. मात्र, ऑनलाईन सभेत विरोधक आपला विरोध कसा नोंदविणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या