Wednesday, June 10, 2026
HomeनगरAhilyanagar : केंद्रप्रमुख पदाच्या भरतीत पात्र उमेदवारांकडून ‘चाचपणी’

Ahilyanagar : केंद्रप्रमुख पदाच्या भरतीत पात्र उमेदवारांकडून ‘चाचपणी’

11 व 12 जून परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील केंद्र प्रमुख पदाच्या परीक्षेद्वारे होणार्‍या भरतीसाठी येत्या 11 व 12 जूनला पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पाहणी करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी काही शिक्षक नेत्यांकडून परस्पर या भरतीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या नावाखाली चाचपणी सुरूअसल्याची माहिती प्राथमिक शिक्षकांंमध्ये आहे. विशेष म्हणजे काही ‘शिक्षक नेते’ परस्पर शिक्षण विभागाच्या नावावर हा प्रकार करत असल्याने भरतीतील पात्र उमेदवारांची अडचण झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या 123 केंद्र प्रमुख पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली असून यात परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची येत्या 11 व 12 जूनला कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधीत उमेदवारांना समुपदेशनाने नेमणुकीचे आदेश देण्यात येणार आहेत. मात्र, या भरतीत काही शिक्षक नेत्यांकडून परस्पर पात्र उमेदवार यांच्याकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर समुपदेशाच्या यादीत नाव येवून द्याचे असल तर भेटा असा सल्ला संबंधीत शिक्षक नेते देत असल्याची चर्चा प्राथमिक शिक्षकांमध्ये आहे.

जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागांसाठी खुल्या पध्दतीने 2025 मध्ये स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीण झालेल्या उमेदवारांची लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना नेमणुका देण्याचे आदेश सरकार पातळीवरून देण्यात आले. त्यानूसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 123 पदासाठी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची आधी कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर नेमणूक कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी पहिल्या टप्प्यात 11 व 12 जूनला पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त जागा दाखवून समुपदेशनाने त्या भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात वस्तूस्थितीत काही शिक्षक नेते या भरतीमध्ये सक्रिय झाले असून आपली उखळ पांढरी करण्यासोबतच शिक्षण विभागाच्या नावाखाली त्यांनी काही उमेदवारांकडून चाचपणी सुरू केली आहे.

जिल्हा परिषदेच्या केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा समुपदेशनाने पारदर्शक पध्दतीने भरण्यात येणार आहे. येत्या 11 व 12 जूनला पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पाहणी करण्यात येणार आहे. या भरतीबाबत काटेकोरपणाबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
डॉ. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...