Friday, May 3, 2024
Homeधुळेजि.प. शाळेचे दोन शिक्षक पॉझिटिव्ह

जि.प. शाळेचे दोन शिक्षक पॉझिटिव्ह

धुळे । प्रतिनिधी Dhule

साक्री तालुक्यातील जबापूर आणि मंदीतोेेेेंडा येथील जि.प. शाळेतील दोन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर रविवारी 24 तासात 18 बाधित आढळले.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालय येथील नऊ, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील दोन, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील पाच, भाडणे साक्री सीसीसीमधील दोन असे एकूण 18 बाधीत आढळून आले आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत चढउतार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: स्वत:ची काळजी घ्यावी, मास्क नागरिकांनी वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पालकांमध्ये संभ्रम

जिल्ह्यात ग्रामीण भागात 7 डिसेंबर रोजी शाळा सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. त्यानंतर मात्र काही शाळेतील शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे शाळेत पाल्याला पाठवावे की नाही असा संभ्रम पालकांमध्ये निर्माण झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या