Friday, January 23, 2026
Homeक्राईमअरे बापरे… चक्क जनरेटरमधून विदेशी दारू, रम, बिअरची तस्करी

अरे बापरे… चक्क जनरेटरमधून विदेशी दारू, रम, बिअरची तस्करी

एलसीबीने आणली उघडकीस; ट्रकसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे : (प्रतिनिधी) । येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पॉवर जनरेटरमधून दिव व दमण केंद्रशासित प्रदेशातील विदेशी दारु, रम व बिअरची होणारी तस्करी मोठ्या शिताफीने उघडकीस आणली. शहरातील सुरत बायपासवर ट्रकला पकडले. 12 लाखांचा ट्रक व 4 लाखांची दारू असा 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दारूची धुळेमार्गे गुजरात राज्यात वाहतुक होत होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल दि. 17 रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. एलसीबीच्या पथकाने सुरत बायपास रोडवरील खान्देश कॅन्सर सेंटर समोर महामार्गावर अडथळा निर्माण करुन एमएच 17 बीवाय 1052 क्रमांकाच्या आयशर ट्रकला पकडले. चालकाने त्याचे नावे विकाससिंग नगेंद्रसिंग चौहान (वय 26 रा.रुम नं.13, धर्मेशभाईको चाळ, भिमपौर, दमण) असे सांगितले. तसेच त्याने ट्रकमधून कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर गुजरात राज्यात घेवून जात असल्याचे सांगुन दिशाभुल करणारी माहिती दिली. मात्र पथकाने बारकाईने जनरेटरची तपासणी केली असता आतील पोकळ भागात विविध कंपनीचा दारूसाठा मिळून आला. त्यातून एकुण 4 लाख 17 रूपये किंमतीची विदेशी दारु, रम व बिअर आणि 12 लाखांचा ट्रक असा एकुण 16 लाख 17 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

ही विदेशी दारु विक्रीबाबत दादरा नगर हवेली प्रशासनाचे फॉर सेल इन यु.टी ऑफ दादरा नगर हवेली अ‍ॅण्ड दमण अ‍ॅण्ड दिव ओन्ली, निर्देश असतांनाही महाराष्ट्र राज्यात वाहतूकीचा किंवा पुरवठा करण्याचा परवाना नसतांना शासनाचा कर बुडवून शासनाची फसवणूक करून महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याचा उद्देशाने मालाचे मालक, खरेदीदार व पुरवठादार यांचे संगनमताने बेकायदेशीररित्या चोरटी वाहतूक करतांना ट्रकचालक मिळून आला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, असई. संजय पाटील, पोहेकॉ. पंकज खैरमोडे, पवन गवळी, आरीफ पठाण, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, पोकाँ. मयुर पाटील, सुशिल शेंडे, राहुल गिरी, हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...