Sunday, April 27, 2025
Homeधुळेआनंदखेडा गावाजनीक अपघातात पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

आनंदखेडा गावाजनीक अपघातात पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

धुळे | प्रतिनिधी

तालुक्यातील आनंदखेडे गावाजवळ झालेल्या अपघातात साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे.  आज सकाळी हा अपघात झाला. या घटनेने पोलीस दलासह गावात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

गुलाब गोविंदा शिंपी (वय ३६ रा. आनंदखेडा ता. धुळे) असे मयत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते दुचाकीने आनंदखेडा ते साक्री अपडाऊन करायचे.आज दि.२७ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असतांना आनंदखेडे गावाजवळच असलेल्या खाडी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीने जीजे १२/७४४७  क्रमांकाच्या ट्रकला मागाहून धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांसह मित्रपरिवारासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांना हिरे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पोकॉं शिंपी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, ५ वर्षांची मुलगी, ३ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...