Friday, April 3, 2026
HomeनगरAhilyanagar : संचमान्यता, पदोन्नती व समायोजनानंतर शिक्षकांच्या बदल्या

Ahilyanagar : संचमान्यता, पदोन्नती व समायोजनानंतर शिक्षकांच्या बदल्या

31 मे पूर्वी बदल्यांची प्रक्रिया राबवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर मध्येच होतात. बदलीनंतर शिक्षकांना त्या शाळांमध्ये रुजू होण्यासाठी काही दिवस लागतात. शिक्षक मधूनच बदलून गेल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही होतो. या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांच्या बदल्या 31 मे पूर्वी होणार आहेत. तत्पूर्वी, संचमान्यतेनुसार रिक्त, अतिरिक्त पदांवर शिक्षकांच्या नेमणुका होतील. त्यानंतर रिक्त राहिलेल्या पदांची बिंदुनामावली निश्चित होऊन जिल्हांतर्गत बदल्या होणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, शिक्षकांच्या संचमान्यतेची माहिती पुण्याला शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाला तपासणीसाठी पाठवण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील संचमान्यतेच्या प्रस्तावात 211 दुरूस्त्या निघाल्या असून त्या पुण्याच्या कार्यालयाला कळवण्यात आल्या आहेत. या दुरूस्त करून संचमान्यता अंतिम करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्याकडून सांगण्यात आले. नगर जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. त्याअंतर्गत 10 हजार 500 वर शिक्षक कार्यरत आहेत. पण, यंदा पटसंख्या घटल्याने काही शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.

आता संचमान्यता झाल्यावर त्या अतिरिक्त शिक्षकांचे पहिल्यांदा समायोजन होईल. त्यानंतर रिक्त झालेल्या पदांची जात संवर्गनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे. बदलीपात्र शिक्षकांकडून त्यांची पसंती घेऊन बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याच दरम्यान, 20 ते 25 वर्षांपासून स्वत:च्या जिल्ह्यात बदली करून जाण्यास इच्छुक शिक्षकांना देखील आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून एक संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण, राज्यात जूनपूर्वी सुमारे दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे. भरतीतील नवे शिक्षक रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यांमध्ये भरणे शक्य होणार आहे.

माहिती संकलित केली जाणार आहे. बदलीपात्र शिक्षकांकडून त्यांची पसंती घेऊन बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याच दरम्यान, 20 ते 25 वर्षांपासून स्वत:च्या जिल्ह्यात बदली करून जाण्यास इच्छुक शिक्षकांना देखील आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून एक संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण, राज्यात जूनपूर्वी सुमारे दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे. भरतीतील नवे शिक्षक रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यांमध्ये भरणे शक्य होणार आहे.

आंतरजिल्हा बदल्याच्या निर्णयाकडे लक्ष
राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षक घरदार सोडून परजिल्ह्यांमध्ये नोकरी करत आहेत. आपले वयोवृद्ध, आजारी आई- वडील, कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर आहेत. अनेक शिक्षक पती-पत्नी 15-20 वर्षे झाले परजिल्ह्यांत कार्यरत असून, बदलीने पती-पत्नी एकत्रीकरण होणे गरजेचे आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा सातवा टप्पा राबवावा, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने राज्य शासनाकडे सातत्याने केली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने 6 जानेवारी रोजी ऑनलाइन बैठक घेत आंतरजिल्हा बदलीला हिरवा कंदील दाखविला आहे. पण, यावरील शासनाचा निर्णय व्हायचा आहे. यामुळे दुसर्या जिल्ह्यात कार्यरत असणार्या शिक्षकांच्या नजरा या आंतरजिल्हा बदलीच्या शासन निर्णयाकडे लागला आहे.

बिंदुनामावलीनंतर बदल्यांची कार्यवाही
संचमान्यता आता अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. संचमान्यता अंतिम झाल्यावर रिक्त, अतिरिक्त जागांवर शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा बिंदुनामावलीनुसार भरणे, बदल्यांची कार्यवाही केली जाईल.
– भास्कर पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी, अहिल्यानगर

ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : पुण्याची आता ‘वॉटर किंगडम’कडे वाटचाल; विजय वडेट्टीवार यांची...

0
मुंबई । Mumbai पुणे शहर आणि जिल्ह्याला गुरुवारी रात्री अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जबरदस्त तडाखा दिला. अवघ्या काही तासांच्या पावसाने संपूर्ण पुणे शहराची दाणादाण उडवली...