Wednesday, March 26, 2025
Homeनंदुरबारआमचे आत्मबल पूर्वीपेक्षाही बळकट: डॉ.हीना गावित

आमचे आत्मबल पूर्वीपेक्षाही बळकट: डॉ.हीना गावित

नंदुरबार | प्रतिनिधी

आदिवासी विकास मंत्री ना. डॉ.विजयकुमार गावित हे पक्षांतर करतील, लवकरच भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देतील; या अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या चर्चेला भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्तया माजी खा.डॉ.हीना गावित यांनी पूर्णविराम दिला.

- Advertisement -

निवडणुकीत अपयश आले म्हणून मी घाबरून जाणारी नाही. पक्ष सोडून कुठेही जाणार नाही.आम्ही भाजपाचे आहोत आणि भाजपातच राहणार आणि स्वतः मंत्री डॉ.विजयकुमार गावित हेच यंदाच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून निवडून येतील, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील चारही आमदार भाजपाचे निवडून आणण्याचा संकल्प डॉ.हीना गावित यांनी संकल्प मेळाव्यात व्यक्त केला.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मंत्री डॉ.विजयकुमार गावित आणि डॉ.हीना गावित हे पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच यांच्या उपस्थितीत आज दि.१२ जुलै २०२४ रोजी बाबा रिसॉर्टच्या सभागृहात हा मेळावा पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी खा.डॉ.गावित बोलत होत्या.
डॉ.गावित म्हणाल्या, संविधान धोक्यात असल्याचे खोटे समज पसरवून विरोधकांनी विजय मिळवला. परंतू जनमत आपल्यालाच अनुकूल असल्याचा गैरसमज करून आमचे काही विरोधक आपल्यामुळेच भाजपाचा पराभव झाल्याचे समजतात. आताही येणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या हाताशी कोणतेही ठोस मुद्दे नाहीत.

म्हणून जलजीवन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे खोटे सांगत सुटले आहेत. वास्तविक आज ओरड करणार्‍या या विरोधकांच्या सत्ता काळातच जलजीवन योजनेच्या कामांची आखणी केली गेली. चुकीचे सर्वे केले गेले.

सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार बिले अदा झालेले असताना हे विरोधक काम पूर्ण नसताना बिल देण्यात आल्याचे खोटे सांगत आहेत. खोट्या गोष्टींचे भांडवल करून अफवा पसरवतात आणि भाजपा सोडून जाणार ही पसरवण्यात आलेली अफवा त्यातलीच आहे, असेही डॉ.गावित यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...