Thursday, January 8, 2026
Homeक्राईमकार चोरी करणारा आंतरराज्यीय टोळीतील गुन्हेगार 'नेपाळी' जेरबंद

कार चोरी करणारा आंतरराज्यीय टोळीतील गुन्हेगार ‘नेपाळी’ जेरबंद

एलसीबीची कामगिरी; महाराष्ट्रात 13, मध्य प्रदेशात अनेक गुन्ह्यांची नोंद

धुळे (प्रतिनिधी)- येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय टोळीतील घरफोडी व चारचाकी वाहने चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला शिताफिने जेरबंद केले. अजय प्रताप कटवाल ऊर्फ नेपाळी (रा. पुरुषोत्तम कॉलनी, रसराज हॉटेलच्या पाठीमागे, नगांवबारी, देवपूर, धुळे) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून तीन लाख रुपये किंमतीची बनावट नंबर प्लेट असलेली कार जप्त करण्यात आली.

शहरातील पांझरा नदीकिनारील गणपती मंदिराजवळ आरोपी अजय कटवाल हा चोरीच्या कारसह उभा असल्याची गोपनिय माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्याच्या सुचनेनुसार पथकाने तत्काळ घटनास्थळी जावून आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीत अजय कटवाल याने आर्यन खान (रा. राणीगंज, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) याच्यासह सुमारे १० ते १२ दिवसांपूर्वी संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथून रात्रीच्या वेळी कार चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३ लाख रुपये किंमतीची बनावट नंबर प्लेट (एमएच-०५/बीएस-११९१) असलेली कार हस्तगत करण्यात आली. या कार चोरीचा गुन्हा संगमनेर पोलीस ठाण्यात (जि. अहिल्यानगर) दाखल असून एलसीबीने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात 13, मध्य प्रदेशात अनेक गुन्ह्यांची नोंद- आरोपी अजय कटवाल याच्यावर दोंडाईचा, नांदगाव पेठ (अमरावती), अंबरनाथ व उल्हासनगर (ठाणे) पोलिसात प्रत्येकी एक, मोहाडीनगर २ , चिपळून (जि. रत्नागिरी) ३, विश्रामबाग (सांगली) २, रामनगर (वर्धा), गाडगे नगर (अमरावती) पोलीस ठाण्यांत २ असे आर्म ऍक्ट, चोरी, घरफोडीचे गुन्हे तर मध्यप्रदेश राज्यात विविध ठिकाणी चारचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

YouTube video player

या पथकाची उल्लेखनीय कामगिरी- ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली असई संजय पाटील, पोहेकॉ. संतोष हिरे, प्रशांत चौधरी, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पोना. धमेंद्र मोहिते, पोकॉ. हर्षल चौधरी, सुशिल शेंडे, राहुल गिरी, कमलेश सुर्यवंशी व जगदीश सुर्यवंशी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रिव्हॉल्वर हलगर्जीपणे हाताळल्याचा ठपका; दोन पोलीस अंमलदार निलंबित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना सुरक्षा देणारे दोन पोलीस बॉडीगार्ड कर्तव्यात कसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत....