Friday, May 3, 2024
Homeजळगावकोरोनाने रोज १०-१२ मृत्यू : अमळनेरात एकाच स्माशनभूमीच्या वापरामुळे मृतदेहांची विटंबना

कोरोनाने रोज १०-१२ मृत्यू : अमळनेरात एकाच स्माशनभूमीच्या वापरामुळे मृतदेहांची विटंबना

अमळनेर प्रतिनिधी

शहरातील वाढत्या कोरोना महामारीत मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने स्मशानभूमीत प्रेतांचे प्रमाण वाढले आहे. अस्थी घेणाऱ्या लोकांना अस्थी मिळत नाही तर अर्धवट जळालेल्या प्रेतांची लचके कुत्रे तोडत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. यामुळे अंत्यसंस्कार इतर स्मशानभूमीत करण्यात यावेत अशी मागणी पैलाड शनीपेठ , ताडेपुरा भागातील नगरसेविका संगीता पाटील यांच्यासह सुमारे १०० नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. या गंभीर प्रश्नाकडे पालीका व स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे

- Advertisement -

शहरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून कोरोनाने कहर केला असून मृत्यूचे प्रमाणात वाढ झाली आहेत. शहरात ४ स्मशानभूमी असतांना कोरोनाने मयत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कर्मचारी नाही. पैलाडमधील एकमेव स्मशानभूमीत सुमारे दररोज १० ते १२ प्रेत अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. परिसरात खाली जमिनीवर सुद्धा जागा उपलब्ध नाही. पालिकेतर्फे अंत्यसंस्कारासाठी लाकूड मोफत मिळत असले तरी संस्कारानंतर दाह लवकर थंड होत नसल्याने शेणाच्या गवरीतच दाह संस्कार केले जात आहेत.

दरम्यान या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गर्दीमूळे प्रेते पूर्ण न जळता अपूर्ण जळत आहेत. त्यात काही कुत्रे प्रेतांची लचके तोडत आहेत आणि बाहेर रस्त्यावर घेऊन जात आहेत. नातेवाईकांना त्यामुळे दुसऱ्या दिवशी अस्थीदेखील मिळत नाहीत

इतर ठिकाणी सुविधा मिळावी

प्रेतांची विटंबना होत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार सानेनगर, खळेश्वर, धार रस्ता या स्मशानभूमीत करण्यात यावेत. त्याठिकाणी पालिकेकडून लाकडांची व्यवस्था करण्यात यावी किंवा शहराबाहेर मोकळ्या जागेत अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका संगीता पाटील, शिवसेना शहर प्रमुख संजय पाटील, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार, नगरसेवक संजय भिल, नगरसेविका राधाबाई संजय पवार, नगरसेवक सुरेश आत्माराम पवार, रणजित रामचंद्र पाटील, अमरजीत पाटील, संजय नवल पाटील, विजय पाटील,भटू फुलपगारे, विश्वजित पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह १०३ लोकांनी आमदार अनिल पाटील ,प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या