धुळे । (प्रतिनिधी) : शिरपूर तालुक्यात गांजाची महाशेती आढळून आली असून लाकड्या हनुमान आणि रोहिणी गावादरम्यान असलेली ही गांजाची महाशेती शिरपूर तालुका पोलिसांनी शोधून काढली आहे. कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये ही गांजा शेती केलेली असून काही ठिकाणी गांजाचे अखंड पट्टे लावलेले आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापुर्वी अशा प्रकरणात आरोपी निष्पन्न होत नसे कारण गांजा शेती ही वन जमिनीवर केली जाते. परंतू यावेळी पोलिसांनी आधीच चार आरोपी निष्पन्न केले असून त्यांना ताब्यात घेतले आहे. सुरज कालुसिंग पावरा, रोहीत सुबाराम पावरा, समिर बळीराम पावरा व रसीलाल हजाराम पावरा चौघे (रा. रोहिणी ता. शिरपूर) अशी चौघांची नावे आहेत. दरम्यान पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून एकूण किती एकरात ही गांजा शेती आहे, त्याची ड्रोनच्या सहाय्याने पाहणी सुरू आहे. दरम्यान या गांजाची कापणी कधी होणार होती, हा माल कुठे जाणार होता, यात आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा शोध घेण्यात येत असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
गांजाची महाशेती; चौघे ताब्यात, ड्रोनच्या सहाय्याने क्षेत्राची पाहणी
शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई