Sunday, July 26, 2026
HomeनगरShirdi : साईदर्शनासाठी येणार्‍या भक्तांसाठी 5 लाखाचे विमा कवच

Shirdi : साईदर्शनासाठी येणार्‍या भक्तांसाठी 5 लाखाचे विमा कवच

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी घेऊन तसेच विविध खासगी अथवा सार्वजनिक वाहनांनी मोठ्या संख्येने भक्त येत असतात. अशा साईभक्तांसाठी ते घरातून निघून शिर्डी येथे पोहचेपर्यंत वाटेत काही दुर्दैवी घटना घडल्यास 5 लाखाचे विमा कवच संस्थानतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

शिर्डी येथे विविध ठिकाणाहून पदयात्रेद्वारे साईबाबांची पालखी घेऊन येणार्‍या साईभक्तांची संख्या मोठी आहे. पायी प्रवासाने शिर्डी येथे येतानी काही दुर्दैवी घटना घडल्यास अशा दुर्घटनाग्रस्त साईभक्त किंवा त्यांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु लाभ मिळण्यासाठी शिर्डी येथे येणार्‍या पालखी मंडळाने आपल्या मंडळाचे नाव त्यात सहभागी होणार्‍या व्यक्तींची नावे आधार क्रमांकासह संस्थानकडे अधिकृतरित्या नोंद केलेली असणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे खासगी अथवा सार्वजनीक वाहनांनी शिर्डी येथे येतांना काही दुर्दैवी घटना घडल्यास अशा साईभक्तांनाही या विमा कवचचा लाभ मिळणार आहे. मात्र या साईभक्तांना साईबाबा संस्थानमार्फत पुरविल्या जाणार्‍या ऑनालईन भक्तनिवास रुम बुकींग, व्हीआयपी आरती पास/दर्शन पास, सत्यनारायण पुजा पास, अभिषेक पुजा पास यापैकी एखाद्या सुविधेसाठी अगाऊ नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशी नोंदणी केलेल्या कोणत्याही वयाच्या स्त्री पुरुष साईभक्तांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शिर्डीला येतांना रस्त्यात दुर्दैवी घटना झालेल्या साईभक्तांच्या वारसांना या विमा पॉलिसीतून 5 लाख रुपये एवढी रक्कम अपघाती विमा म्हणून मिळणार आहे. सर्व साईभक्तांनी व पालखी मंडळांनी या योजनेची नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...