जळगाव, – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांपुर्वीच जाहीर झाला आहे. विधानसभा मतदार संघाकरीता जिल्ह्यात बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १८, १९, २०, २३ नोव्हेंबर रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुक खुल्या, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.१८ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ६.०० वाजेपासुन मतदान संपण्या अगोदर ४८ तास कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. तर मतदानाच्या पूर्वीचा दिवस म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी संपुर्ण दिवस आणि तसेच मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस कोरडा दिवस असणार आहे. त्यासोबतच मतमोजणीचा संपूर्ण दिवस म्हणजेच २३ नोव्हेंबर देखील कोरडा दिवस असेल असे आदेशात नमुद केले आहे.
चार दिवस मद्यविक्री करण्यास मनाई
ताज्या बातम्या
अग्निवीरांना शासकीय-निमशासकीय सेवेत संधी?
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना राज्याच्या शासकीय- निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळण्याची शक्यता...




