दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आंदोलन
जळगाव- जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे जम्मू कश्मीर मध्ये दोडा व कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी देशद्रोही अतिरेकी हल्ल्याप्रकरणी केंद्र सरकार व गृहमंत्री यांचा निषेध करण्यात आला.
केंद्रातील मंत्री यांना पक्ष फोडाफोडसाठी वेळ आहे व देशात देशाच्या सीमा रक्षणासाठी वेळ नाही या सर्व बाबींचा निषेध करण्यात आला. निदर्शन वेळी भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनामाची मागणी जळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख तायडे, युवा जिल्हाधिकारी निलेश चौधरी, देवेंद्र देशमुख, उमेश पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, प्रशांत सुरळकर, नितीन सपके, पियुष गांधी, चंद्रशेखर भावसार, मनीष पवार, उमेश चौधरी, अॅड दर्शन चौधरी, निलेश देशमुख उपजिल्हा समन्वयक विजय पाटील, जयदीप पाटील, विजय लाड, अंकुश कोळी, अॅड नेमीचंद येवले, विजय लाड, राजेश वारके, शैलेश काळे, गणेश गायकवाड, संजय सांगोळे, विशाल काळे, सचिन पाटील, शुभम निकम, वसंत सोनवणे, यश सपकाळे, विशाल वाणी, जय मेहता, राकेश पाटील, बंटी शर्मा, पुनम परदेशी, विलास पवार, मोहन भोई, सलीम खाटीक, स्वप्निल परदेशी, सुनील राणे, जया तिवारी अण्णा भोईटे, नीताताई सांगोळे, मनीषाताई पाटील, निलूताई इंगळे, जयाताई तिवारी, शरीफ रंगरेज, राकेश घुगे, तसेच देशभक्त नागरिक व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.