Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - कर्क

त्रैमासिक भविष्य – कर्क

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑक्टोबर- 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी शुक्र , तृतीयात रवि, चतुर्थात बुध, पंचमात केतू, षष्ठात गुरू-प्लुटो, सप्तमात शनि, अष्टमात नेपच्यून, नवमात मंगळ, दशमात हर्षल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे,डो अशी आहेत. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी चंद्र, तत्व-जल, चर राशी असल्यने स्वभाव चंचल, उत्तर दिशा शुभ आहे. सत्व गुणी, वर्ण-ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रकृती, राशीचा अंमल छातीवर आहे.. शुभ रत्न मोती, शुभ रंग- पांढरा, क्रीम, शुभ दिन – सोमवार, शंकराची उपासना फायद्याची आहे. शुभ अंक-2, शुभ तारखा- 2,11,20,23. मित्र राशी- वृश्चिक, मीन, तुला, शत्रु राशी- मेष, सिंह, धनु, मिथून, मकर, कुंभ. अध्ययनाची आवड. जलप्रिय, भावनाप्रधान. कुशल प्रबंधक, कल्पनाशील. योजना तयार करण्यात प्रविण. प्रामाणिक, भावुक, विचारी, परोपरकारी.चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात सारखे काम करीत राहण्याचा कदाचित कंटाळा येईल. पण तसे करणे फायद्याचे ठरणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा, वेळ वाया जातो. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही. त्यातल्या त्यात पिताश्रीकडून काही मिळण्याची अपेक्षा करु नये.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारपाजारच्या स्त्रिया तुमचा हेवा करतील. सुशिक्षीत महिलांना विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळा. गेलेला वेळ परत येणार नाही. शुभ तारखा – 2, 4, 9, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31

नोव्हेंबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयात शुक्र, चतुर्थात रवि-बुध, पंचमात केतू, षष्ठात गुरू-प्लुटो, सप्तमात शनि, अष्टमात नेपच्यून, नवमात मंगळ, दशमात हर्षल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात रवि आहे. राजकारणी लोकांसाठी चांगला आहे. आर्थिक उत्पन्नात वृद्धी होण्यासारख्या उलाढालीत भाग घेण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेतीपासून चांगला फायदा होईल. वृद्धांसाठी हा महिना विशेष चांगला राहील. शारिरीक व्याधी कमी होतील. आरोग्य चांगले राहील. द्राक्ष बागाईतदारांना व्यापारांद्वारे आर्थिक लाभ होतील.

षष्ठात गुरू आहे. सहावा गुरू चांगला नाही असे समजले जाते. शत्रु जिंकण्याची शक्यता असते. मात्र वैद्यकीय व्यवसायाला हा गुरू पोषक आहे. सार्वजनिक प्रश्नांची चर्चा करणे आवडेल. नोकर वर्गालाही हा गुरू विशेष चांगला आहे. नोकरी पदोन्न्ती होण्याची किंवा इच्छित स्थळी बदली होण्याची शक्यता आहे. शरीर स्थूल होऊ नये म्हणून नियमीतणे व्यायाम करा. प्रकृती निरोगी राहील. मात्र पचनाच्या किरकोळ तक्रारी चालू राहतील.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायनवादनादी ललित कलात प्रगती होईल.

नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता तीक्ष्ण राहील. त्यामुळे वार्षिक परिक्षा देणे जास्त अवघड वाटणार नाही. या महिन्यात वाचनाचा सराव जेवढा वाढवाल. तितक्या प्रमाणात टक्केवारी वाढेल.शुभ तारखा – 4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

डिसेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयात शुक्र, चतुर्थात रवि-बुध, पंचमात केतू, षष्ठात-गुरू- प्लूटो, सप्तमात शनि, अष्टमात नेपच्यून, नवमात मंगळ, दशमात हर्षल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात केतू आहे. केतू धर्माचरण करण्यास ओढ लावेल. उपासनेतत चांगले यश मिळेल. याठिकाणी केतू असता संसार सुखात अडचणी येतात. मुलांच्या प्रकृतीविषयी अडचणी निर्माण होतात. मुली दिर्घायुषी निघतात. मोठ्या मुलांची वागणूक पित्याच्या विरोधात दिसून येते. पत्नीचा चेहरा उतरलेला असतो. कन्या संततीचे प्रमाण अधिक असते. राजकारणी लोकांना सत्तेत असलेल्या सरकारकडून काही ना काही त्रास होण्याची भिती राहते. मांत्रिक विद्येची आवड राहील.

तृतीयात शुक्र आहे. कृपण वृत्ती राहील. पराक्रमाला जोर येईल. आळसाचे आकर्षण वाटेल. बंधूप्रियता वाढेल. डोळ्याच्या विकाराची शक्यता आहे. कवी वर्गाला उत्तम कविता सुचतील. स्वभाव आनंदी व उल्हासी राहील.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील. शंकराची उपासना केल्यास या दोषावर नियंत्रण येईल. सासरवाडीकडून मदतीची विचारणा होण्याची शक्यता आहे. रवि-गुरू शुभ योग आहेत. प्र्र्रकृती उत्तम राहील. श्रीमंत व थोर लोकांशी मैत्री होईल. नितीमत्तेत वृद्धी होईल. मोठ मोठ्या योजनांची जबाबदारी स्विकारू शकाल.

स्त्रियांसाठी -पतिराजांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे जास्त चातुर्याचे ठरेल. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी – अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ आणि टी.व्ही.कडे दुर्लक्ष करणे भविष्यासाठी फायद्याचे राहील.शुभ तारखा – 4, 5, 8, 12,13, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या