Thursday, May 14, 2026
Homeक्राईमCrime News : भुरळ पाडून महिलेचे दागिने व रोख रक्कम लंपास

Crime News : भुरळ पाडून महिलेचे दागिने व रोख रक्कम लंपास

नगरमधील घटना, तोफखान्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन अनोळखी इसमांनी आमच्या बरोबर चला, एका ठिकाणी महिलांसाठी मोफत साड्या व चप्पल वाटप सुरु आहे. आम्ही ते तुम्हाला मिळवून देतो अशी बतावणी करत भुरळ पाडून त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत, रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत आशा बुलाखे (वय 55, रा. इरिगेशन ऑफिसजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या संजय गांधी निराधार योजनेचे योजनेचे पैसे काढण्यासाठी मंगल गेट परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांचा पाठलाग करीत होता. तो इसम फिर्यादी यांना म्हणाला माझ्यासोबत चला मी तुम्हाला साड्या व चप्पल घेऊन देतो, असे बोलून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

फिर्यादी या त्याच्यासोबत गेल्या. त्याने मंगलगेट येथील एका दुकानाबाहेर फिर्यादी यांना बसवले. त्यानंतर दोघांनी फिर्यादीची दिशाभूल करुन त्यांची पिशवी घेऊन फरार झाले. यावेळी फिर्यादी यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला असता तेथे लोकांची गर्दी जमा झाली. त्यानंतर बुलाखे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...