Friday, September 20, 2024
Homeधुळेदोंडाईचात भोगावती नदीला पूर; हातगाड्या, ...

दोंडाईचात भोगावती नदीला पूर; हातगाड्या, टपर्‍या, दुचाकी गेल्या वाहुन

तहसीलदारांनी नुकसानीची केली पाहणी

दोंडाईचा (श.प्र.)- शहरासह परिसरात काल दि.१६ रोजी रात्री दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठावरील घरामध्ये पाणी शिरले. चैनी रोड परिसरातील गोविंद नगर येथील संघम डेअरीच्या गल्लीत उड्डाणपूलाचे काम सुरू असून त्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घरात पाणी शिरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच वरवाडे भागातील हात गाड्या, टपर्‍या आणि दोन मोटारसायकली वाहून गेल्या होत्या. त्या पाठोपाठ अमरावती नदीलाही पूर आला आहे. नदीच्या पुरामुळे काही नागरिकांचा संपर्क तुटला आहे. दि. १७ रोजी तहसीलदार संभाजी पाटील यांची घटनास्थळी भेट देवून शहर तलाठी संजीव गोसावी यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच उड्डाणपूलाच्या ठेकेदार प्रतिनिधी यांच्या सोबत चर्चा करून त्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

- Advertisement -

महसूल विभागाकडून २५ घरांचा पंचनामे करण्यात आले असून घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर दोन घरांच्या भिंती पडल्या असून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान पुराचे पाणी घरांमधये शिरल्यानंतर घटनास्थळी परिसरातील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, नरेंद्र गिरासे, सचिन मराठे आदींनी धाव घेऊन मदत कार्य केले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, हेमंत राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवून होते. तसेच महसूल विभागातील दोंडाईचा शहर तलाठी संजय गोसावी, नारायण मांजळकर आदी घटनास्थळी दाखल झाले होते.् अनेक वर्षानंतर पूर आल्याने नागरिकांनी पूर बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान संबंधित ठेकेदारांनी तात्काळ भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नुकसानग्रस्तांनी दिला आहे. तसेच कुरकवाडे गावात दोन तीन घरांमध्ये पाणी शिरले होते. सुराय, मांडळ गावांमध्ये देखील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या