Sunday, September 8, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यात आजपर्यंत 89 हजार ...

धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 89 हजार 313 महिला लाभार्थ्यांची नोंदणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजना

धुळे | प्रतिनिधी : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 89 हजार 313 महिलांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये 54 हजार 890 महिलांनी ऑफलाईन तर 34 हजार 723 महिलांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शन व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे नियोजनानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या नियंत्रणाखाली धुळे जिल्ह्यात 2 हजार 378 केंद्रावर महिलांचे अर्ज जमा करण्याचे काम सुरु आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनाने आजपर्यंत  धुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात 17 हजार 208 ऑनलाईन तर 19 हजार 116 ऑफलाईन असे एकूण 36 हजार 324 अर्ज, शिंदखेडा ग्रामीण, शिंदखेडा नगरपालिका व दोंडाईचा नगरपालिका क्षेत्रात 6 हजार 337 ऑनलाईन तर 8 हजार 78 ऑफलाईन असे एकूण 14 हजार 115 अर्ज, शिरपूर ग्रामीण, शिरपूर नगरपालिका क्षेत्रात 6 हजार 471 ऑनलाईन तर 23 हजार 100 ऑफलाईन असे एकूण 29 हजार 571 अर्ज तसेच साक्री तालुक्यातील साक्री ग्रामीण, साक्री नगरपालिका, पिंपळनेर नगरपालिका क्षेत्रात 4 हजार 707 ऑनलाईन तसेच 4 हजार 5946 ऑफलाईन असे एकूण 9 हजार 303 लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच या योजनेच्या लाभासाठी अर्ज भरण्यासाठी धुळे जिल्ह्यात 5 हजार 16 नागरिकांनी नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड केले आहे. त्याचबरोबर या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होवू नये तसेच त्यांना कोणतीही अडचण येवू नये याकरीता जिल्हाभरात 2 हजार 378 केंद्र सुरु करण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   

- Advertisement -

दृष्टीक्षेपात-  34 हजार 723 महिला  लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी. 54 हजार 890 महिला लाभार्थ्यांची ऑफलाईन नोंदणी. 89 हजार 313 महिलाचे अर्ज प्राप्त झाले. 5 हजार 16 नागरिकांनी नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड केले. जिल्ह्यात नोंदणीसाठी 2 हजार 378 सेंटर सुरु.

- Advertisment -

ताज्या बातम्या