Monday, November 25, 2024
Homeनंदुरबारनवापूर येथे ६ लाखांची ३२ हजार ९८६ युनीट वीजचोरी

नवापूर येथे ६ लाखांची ३२ हजार ९८६ युनीट वीजचोरी

नंदुरबार | प्रतिनिधी –

नवापूर शहरात वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करुन ६ लाख ११ हजार ७९ रुपयांची ३२ हजार ९८६ युनीट वीज चोरी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मालेगाव येथील वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने केली.

- Advertisement -


याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर येथील नारायणपूर रस्त्यावरील घर क्रमांक ६०२ मध्ये राहणार्‍या हारुन शब्बीर खाटीक याने दि.२७ ऑगस्ट २०२२ ते २६ जून २०२४ या कालावधीत याने वीज मिटरमध्ये फेरफार करुन महाराष्ट्रय राज्य विज वितरण कंपनी मर्यादीतच्या ७१ हजार ९५६ रुपयांची ३ हजार ९५ युनिट्स वीजेची चोरी केली.

नवापूर येथील मुख्य रस्त्यावरील कापड दुकानदार गिरीश माधवदास खिलवानी याने दि.२७ जुलै २०२२ ते २६ जून २०२४ या कालावधीत वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करुन १९ हजार २१८ रुपयांच्या ८७४ युनीट वीजेची चोरी केली.

नवापूर येथील शास्त्रीनगर भागात राहणार्‍या समीर गुणवंतलाल दलाल याने दि.२७ ऑक्टोबर २०१९ ते २६ जून २०२४ या कालावधीत वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करुन ७७ हजार २४२ रुपयांची ४ हजार ४१६ युनीट वीजेची चोरी केली.

नवापूर येथील मुख्य रस्त्यावरील विश्‍वास सुरजी गावित याने दि.२७ ऑक्टोबर २०१७ ते २६ जून २०२४ या कालावधीत वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करुन १ लाख ६१ हजार २६८ रुपयांची ९ हजार ४९ युनीट वीजेची चोरी केली.

नवापूर येथील जनता पार्क येथील रहिवासी कल्पना वसंत चौरे यांनी वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करुन दि. २७ मार्च २०१६ ते २६ जून २०२४ या कालावधीत २ लाख ४६ हजार ४११ रुपयांची १३ हजार ९६१ युनीट वीजेची तसेच १३ हजार ७२९ रुपयांची ५२२ युनीट वीजेची चोरी केली.

नवापूर येथील बेलदारपाडा येथील दामू वन बिर्‍हाडे, राकेश दामू बिर्‍हाडे, यांनी वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करुन दि.२७ मार्च २०१६ ते २६ जून २०२४ या कालावधीत २१ हजार २५५ रुपयांची १ हजार ४९ युनीट वीजेची चोरी केली.

अशी एकुण सहा जणांनी ६ लाख ११ हजार ७९ रुपयांची ३२ हजार ९८६ युनीट वीज चोरी केली. याबाबत भरारी पथकाचे मालेगाव येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत ठोसर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास नवापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या