Thursday, January 29, 2026
Homeक्राईमपती झाला हैवान; काठी, बॅटरीने वार करीत पत्नीची निर्घृण हत्या

पती झाला हैवान; काठी, बॅटरीने वार करीत पत्नीची निर्घृण हत्या

पिंपळनेर | वार्ताहर

दारूच्या नशेत हैवान झालेल्या पतीने सळई असलेल्या काठीने व चार्जिंगच्या बॅटरीने डोक्यावर वार करीत पत्नीची निर्घृण हत्या केली. काल दि. ५ रोजी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आज पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

- Advertisement -

झिंगुबाई धाकलु गायकवाड (वय ३९ रा.धामंधर, पो. शेवगे, ता. साक्री) असे मयत पत्नीचे नाव आहे. दि.५ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पती धाकलु चुनिलाल गायकवाड हा दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने किरकोळ कारणावरून पत्नीशी वाद घातला. त्यादरम्यान त्याने लोखंडी सळईत असलेल्या लाकडी काठीने पत्नी झिंगुबाई हिच्या डोक्यात वार केला. त्यानंतर काठीने बेदम मारहाण करुन चार्जिंग करण्याच्या बॅटरीने डोक्यात मारुन खून केला. दुसर्‍या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयत महितीचा भाऊ चंदू परशराम जगताप (रा. आंबापाडा) याने दिलेल्या फिर्यादीवरून धाकलु गायकवाड याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ११५ (२), ११८ (१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भुषण शेवाळे करीत आहेत.

YouTube video player

घाबरून रक्ताने माखलले कपडे बदलले- धाकलू गायकवाड याने पत्नी झिंगुबाई हिचा खून केल्यानंतर तो घरातील पुढच्या खोलीत झोपुन गेला. सकाळी जाग आल्यावर पत्नीला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती उठली नाही. त्यामुळे त्याने घाबरुन तिचे अंगावरील रक्ताने माखलेले कपडे बदलले. काहीवेळाने तेथे पोलीस व ग्रामस्थ आल्याने ही घटना उघडकीस आली.

ताज्या बातम्या

Ajit Pawar Funeral : अलविदा दादा! उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन; शासकीय...

0
बारामती | Baramati राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं काल (बुधवारी) सकाळी ८.४५ च्या सुमारास वयाच्या ६६ व्या वर्षी...