Tuesday, March 25, 2025
Homeधुळेपौष्टिक कॅटबरीमध्ये आढळल्या अळ्या, किडे

पौष्टिक कॅटबरीमध्ये आढळल्या अळ्या, किडे

पिंपळनेर | वार्ताहर – चक्क पौष्टिक कॅटबरीमध्येच अळ्या आणि किडे आढळल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यातुन समोर आली आहे. भोनगाव (ता. साक्री) जि.प.शाळेच्या शालेय पोषण आवारातील पौष्टिक कॅटबरीमध्ये जिवंत अळी आणि किडे आढळून आले आहेत. याप्रकारामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान हा प्रकार लक्षात येताच स्थानिक पालकांनी दि.२७ रोजी पंचायत समिती सदस्या सौ.संगीता गावित यांचे पती, सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित यांना फोनवर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी भोनगाव जिल्हा परिषद शाळेला भेट देत सत्यता पडताळून पाहिली. विद्यार्थ्यांना शालेय पोषक आहार मध्ये कॅटबरी देण्यात आल्या होत्या. त्यात किडे व जिवंत अळी दिसून आली. गरिबांच्या मुलांच्या जिवाशी खेळले जात असल्याचे म्हणत संताप व्यक्त करण्यात आला. तसेच हा आहार पुरवठा करणार्‍या ठेकेदाराचे टेंडर रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी पालक व लोकप्रतिनिधींनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...