Thursday, September 19, 2024
Homeधुळेबुलढाण्यातील व्यावसायीकाची सिनेस्टाईल लुट

बुलढाण्यातील व्यावसायीकाची सिनेस्टाईल लुट

छडवेलनजीकची घटना, १५ जणांवर गुन्हा

धुळे | प्रतिनिधी- साक्री तालुक्यातील छडवेल गाव शिवारात बुलढाणा जिल्ह्यातील व्यावसायीकाची सिनेस्टाईल लुट करण्यात आली. त्याला बेदम मारहाण केली. अंगावरील कपडे फाडले. जवळील रोकड व एटीएम स्वॅप करून एकुण २ लाख ८५ हजार रूपये लुटून नेले. पुन्हा त्यास गावानजीक सोडत मोबाईल परत देत एक बनावट पाचशेची नोट देखील दिली. हा गुन्हा बुलढाणा जिल्हा पोलिस ठाण्यावरून निजामपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत महमंद शारीक महमंद जाकीर (वय २८ रा. वार्ड १४, जुना जालना रोड, देऊळगाव राजा जि. बुलढाणा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यास अज्ञात इसमांनी दि. ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दुचाकीवर बसवून छडवेल गावाच्या एका कच्च्या रस्त्याने दहा ते पंधरा कि.मी आत नेले. त्याठिकाणी अचाकन दुचाकींवर १५ इसम आले. त्यांनी तुझ्या सोबत स्कॅम झाला असल्याचे सांगितले. त्यादरम्यान फिर्यादी याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास इसमांनी मारहाण केली. तसेच मोबाईल हिसकावून घेत फोन पे व गुगल पेचा पासवर्ड देत नाही, तोपर्यंत मारहाण केली. बॅगेतील ५० हजारांची रोकड, एटीएम व इतर कागदपत्रे हिसकावून घेतली. अंगावरील कपडे फाडून टाकले. मोबाईलमधील डेटा ट्रान्सफर करून घेतला. गळ्याला चाकु लावून व पिस्तुलीचा धाक दाखवित ठोकण्याची धमकी दिली. त्यामुळे महमंद याने मित्राकडून ऑनलाईन १५ हजार रूपये मागावून घेतले. त्यानंतर लुटारूंनी फिर्यादीच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममधून स्वॅपमशीनवरून २ लाख २० हजार रूपये काढून घेतले. सायंकाळी परत फिर्यादीस दुचाकीवर बसवून छडवेलगावानजी आणून सोडले. तेथे मोबाईल परत दिला. तसेच त्यांच्याजवळील ५०० रूपयांची नोट दिली. त्यानंतर फिर्यादी हा नंदुरबारबसमध्ये बसला असता ती नोट कंटक्टरला दिली असता ती नकली असल्याचे सांगितले. त्यानंतर मित्राकडून एका प्रवाशाच्या मोबाईल ७०० रूपये मागावून फिर्यादी हा नंदुरबार तेथून रेल्वे छत्रपती संभाजी नगर व पुढे बसने देऊळगाव राजा गाव गाठत बुलढाणा जिल्हा पोलिसात तक्रार दिली. हा गुन्हा शुन्य क्रमांकाने निजामपूर पोलिस ठाण्यात वर्ग झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या