Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमभर झोपेतच टिकमने वार करीत पत्नीची निर्घृण हत्या

भर झोपेतच टिकमने वार करीत पत्नीची निर्घृण हत्या

दभाषीतील खळबळजनक घटना

धुळे । (प्रतिनिधी) : दभाषी (ता. शिंदखेडा) येथे पहाटेच्या सुमारास खळबळजनक घटना घडली. चारित्र्याच्या संशयातून पतीने भर झोपेत असलेल्या पत्नीवर टिकमने वार करीत तिची निर्घुण हत्या केली. आरोपी पती फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

सोनीबाई मोहन भिल (वय 35 रा. दभाषी) असे मयत पत्नीचे नाव आहे. ती काल रात्री आपल्या घरवजा झोपडीच्या बाहेर खाटेवर झोपलेली होती. मध्यरात्री पती मोहन जगदीश भिल (रा.मंदाणे ता.शहादा जि.नंदुरबार) याने चारित्र्याच्या संशयातून भर झोपेत असलेल्या पत्नी सोनीबाई हिच्या डोक्यावर टिकमने वार करीत तिचा खून केला. सकाळी सोनीबाई ही खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. फॉरेन्सीक पथक, श्‍वान पथकाला पाचारण केले. मयत सोनीबाई हिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार नरडाणा पोलिसात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....