Tuesday, March 25, 2025
Homeधुळेमहागड्या कार भाड्याने घेत परस्पर विक्री करणारी हैदराबादची टोळी गजाआड

महागड्या कार भाड्याने घेत परस्पर विक्री करणारी हैदराबादची टोळी गजाआड

धुळे तालुका पोलिसांची कामगिरी; दोन वाहने जप्त

धुळे । प्रतिनिधी- मोठ्या शहरांमध्ये चालकाविना आलीशान कार भाडयाने पुरविणार्‍या कंपन्या कार्यरत आहेत. अशा कंपन्यांकडुन भाडयाने वाहने घेवून त्यांची परस्पर विक्री करुन फसवणुक करणाऱ्या हैदराबादच्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीत सहा जणांचा समावेश असून त्यांच्याकडून दोन कार जप्त करण्यात आल्या. त्यांच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून आणखी इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील अभिषेक शिवाजी पाटील (वय 29) यांना सेकंडहॅन्ड वाहन खरेदी करायचे असल्याने त्यांचा चांगल्या वाहनासाठी शोध सुरु असतांना त्यांना सोशल मीडियावरुन महिंद्रा कंपनीची कार (टीएस 07 केबी 7004) विक्रीस असल्याचे समजल्याने त्यांनी अरबाज नसीम शेख (वय 26), मो. अझरुरुददीन अब्दुल रज्जाक (वय 25), सैय्यद अबरार, अकबर अहमद (वय 26) यांच्याशी संपर्क केला. तेव्हा त्यांनी पाटील यांना शिरुड चौफुली येथे बोलावून वाहन दाखविले. वाहन आकर्षक किंमतीत विक्री करण्याचे आमिष दाखवुन तीन लाख रुपये आगाऊ रकमेची मागणी करुन वाहन त्यांना सुपूर्द केले. तसेच उर्वरीत रक्कम तीन लाख रुपये वाहन नावावर केल्यानंतर द्यायचे असल्याचे ठरवले. तिघे वाहन पाटील यांच्या ताब्यात देवुन तीन लाख रुपये घेवुन निघुन गेले होते. त्यानंतर उर्वरीत रक्कम अदा करुन वाहन नावावर करुन देण्यासाठी तक्रारदार यांनी तिघांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दहा दिवसांनी काही व्यक्तींनी पाटील यांच्याकडे आले. त्यांनी त्यांची नावे मो. मझर अहमद इप्तेकार अहमद सिध्दीकी (वय 30), मोहम्मद अब्दुल्लाबीन सैफ (वय 32), सैय्यद शहा फवाद शहा (वय 22 सर्व रा. चंद्रयान गुटटा, हाफी बाबा नगर, हैद्राबाद) असे सांगून तुमच्याकडे असलेल्या कारचे मालक आम्ही असल्याचे सांगत जीपएसद्वारे आम्ही कार शोधत तुमच्यापर्यंत आलो असून हे वाहन चोरी झाल्याची तक्रार झाली असल्याने ही कार फिर्यादी पाटील यांच्या ताब्यातुन घेवुन गेले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याची फिर्यादी पाटील यांची खात्री झाली होती.

- Advertisement -

दोन दिवसांपुर्वी फिर्यादी पाटील यांनी पुन्हा नाव बदलुन आरोपीतांशी संपर्क साधुन कार खरेदी करायची असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीनी फिर्यादीस मारुती सुझुकी कारचा फोटो व्हाटअपवर दाखविल्याने फिर्यादी यांनी कार खरेदी करायची असल्याचे सांगितले असता आरोपीतांनी त्यांना शिरुड चौफुली येथे बोलविले. फिर्यादी पाटील हे आरोपीतांनी बोलावल्याप्रमाणे गेले असता फिर्यादी यांनी तीन आरोपीतांना ओळखल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने लोकांचे मदतीने सहाही जणांना पकडले. तसेच त्यांना धुळे तालुका पोलिसांच्या गस्ती पथकाच्या ताब्यात दिले. पोलिसांनी सहाही जणांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी फिर्यादी पाटील यांची फसवणुक केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील, पोकॉ छाया पाटील, पोहेकॉ कुणाल पानपाटील, उमेश पवार, पोकॉ विशाल पाटील, पोहेकॉ ललीत खळगे, योगेश पाटील, अविनाश गहिवड, चेतन कंखरे, पोकॉ योगेश कोळी, धिरज सांगळे, पोकॉ सखाराम खांडेकर, राजु पावरा भावेश झिरे यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...