धुळे (प्रतिनिधी) : शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्यांनाच थेट मारहाण करणे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना चांगलेच भावले आहे. त्यांना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज तडकाफडकी निलंबित केले. तसेच त्यांची चौकशी धुळे शहर विभागाचे एसडीपीओ राजकुमार उपासे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान कथित मारहाणप्रकरणी पोलिस निरिक्षक कांतीलाल पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा १६०/२०२५ कलम ११५(२),३५२,३५१(२) अन्वये दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास साक्रीचे एसडीपीओ संजय बांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. याबरोबर पीआय पाटील यांचा चार्ज शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे देण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
दरम्यान तक्रार देण्यासाठी आलेल्याना पीआय कांतीलाल पाटील यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज शिरपूर शहरात निषेध मोर्चा देखील करण्यात आला होता.
मारहाण भोवली; शिरपूर शहरचे पीआय के. के. पाटील निलंबित

ताज्या बातम्या
Nashik News : नाशिक कृउबा समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरुद्ध अविश्वास ठराव...
पंचवटी | प्रतिनिधी | Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik APMC) सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingale) हे बाजार समितीत मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कामकाज...