Thursday, March 27, 2025
Homeक्राईममालेगावचा चोरटा धुळ्यात जेरबंद, ५ दुचाकी हस्तगत

मालेगावचा चोरटा धुळ्यात जेरबंद, ५ दुचाकी हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी: गुन्ह्याची उकल

धुळे | प्रतिनिधी

येथील जिल्हा रूग्णालय परिसरातून दुचाकी लंपास करणार्‍या मालेगावच्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याने लळींग कुरणात लपवून ठेवलेल्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील शौचालयाजवळ एक जण चोरीच्या दुचाकीसह उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरिक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने बसस्थानक परिसरातून निसार शहा पिरन शहा (रा.मास्टर कॉलनी, रमजानपुरा, मालेगाव, जि.नाशिक) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने धुळ्यासह नाशिक जिल्ह्यातून देखील दुचाकी लंपास केल्या होत्या. तसेच या दुचाकी धुळे शहरानजीक असलेल्या लळींग कुरणात लपवून ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याकडून ८५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त केल्या. त्याच्याकडून शहर पोलिसात दाखल दुचाकी चोरीच्या एका गुन्ह्याचीही उकल झाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक श्रीराम पवार, पोसई योगेश राऊत, अमरजित मोर, रविंद्र बागुल, असई संजय पाटील, पोहेकॉ संतोष हिरे, पोना रविकिरण राठोड, पोकॉ सुशिल शेंडे, निलेश पोतदार, गुणवंत पाटील, सागर शिर्के यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

काय केल्यास कलह-आजार नाहीसे होतात ?

0
वास्तुशास्त्रानुसार घर बांधणे हे एक शास्त्र आहे. यात घराची दिशा आणि विविध गोष्टींचे स्थान यांचेही शास्त्र आहे, ज्याचा अध्यात्म आणि ग्रहांशी खोलवर संबंध आहे....