Friday, May 3, 2024
Homeनगरशहर पोलिसांचा झेंडीगेट परिसरात कत्तल खान्यावर छापा

शहर पोलिसांचा झेंडीगेट परिसरात कत्तल खान्यावर छापा

अहमदनगर। प्रतिनिधी। Ahmednagar

शहरातील झेंडीगेट परिसरात गोवंश जनावरांच्या कत्तल खान्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी एक लाख सात हजार रुपये किंमतीचे 11 जिवंत गोवंश जातीचे जनावरांची सुटका केली. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शाहरुख रोफ कुरेशी (रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट) याच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1), महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5 (ब), महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 69 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

झेंडीगेट परिसर, आंबेडकर चौक येथील एका पत्र्याचे शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरांना कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवण्यात आलेली आहेत. अशी माहिती उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानुसार उपअधीक्षक मिटके यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक व दोन पंचासह छापा टाकुन 11 जिवंत गोवंश जातीचे जनावरांची सुटका केली. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. ए. पवार,

पोलीस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ, उपनिरीक्षक कचरे, कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या