Monday, September 30, 2024
Homeधुळेशिक्षिकेचा गहाळ मोबाईल अवघ्या ...

शिक्षिकेचा गहाळ मोबाईल अवघ्या २५ मिनिटात मिळवून दिला परत

सायबर पोलीस ठाण्याची कामगिरी

धुळे | प्रतिनिधी

येथील सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने गहाळ मोबाईल अवघ्या २५ मिनिटात परत मिळवून दिला. पोलिसांच्या उत्कृष्ठ कामगिरीचे पोलिस अधिक्षकांनी कौतूक केले आहे.

शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या शिक्षिका सुषमा हर्षल देशमुख या खाजगी कामानिमित्त बाहेर फिरत असतांना सिव्हील हॉस्पीटल येथे आल्यानंतर त्यांना आपला मोबाईल गहाळ झाला असल्यााचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठत मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली. तेव्हा कर्तव्यावर असलेले अंमलदार पोना महेश मराठे यांनी त्यांच्याकडे मोबाईल बाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांनी काही खाजगी कामानिमित्त देवपूरातील इंदिरा गार्डन ते जुने सिव्हील हॉस्पीटल असा रिक्षाने प्रवास करीत असल्याचे सांगितले. मोबाईल क्रमांकावर कॉल केले असता रिंग वाजत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अंमलदारांनी मोबाईलचे लाईव्ह लोकेशन मिळण्यासाठी असई संजय पाटील यांना संपर्क साधला. त्यांना लोकेशन प्राप्त झाले. लाईव्ह लोकेशनस्थळी जावुन तो मोबाईल रिक्षा चालकाकडून ताब्यात घेत सुषमा देशमुख यांना परत देण्यात आला. मोबाईल परत मिळाल्याने सुषमा देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisement -

सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई  किरण कोठुळे व पोना महेश मराठे यांनी अवघ्या २५ मिनीटात ही कामगिरी  केली. 

- Advertisment -

ताज्या बातम्या