Friday, November 22, 2024
Homeधुळेशिरपूरात चोरट्यांनी एटीएमला लावली आग

शिरपूरात चोरट्यांनी एटीएमला लावली आग

धुळे | प्रतिनिधी

शिरपूरातील सावळदे-शिंदखेडा रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम आज पहाटे चोरट्यांनी फोडले. अवघ्या काही मिनिटातच चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत ९ लाख ९६ हजारांची रोकड लंपास केली. जातांना चोरट्यांनी एटीएमला आग लावून पेटवून दिले. त्यात एटीएमसह दोन एसी जळून खाक झाले आहेत. याबाबत उशिरापर्यंत शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यातचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान तीन दिवसांपुर्वीच चोरट्यांनी शहरातील रसिकलाल पटेल नगरातील स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न केला होता.
सावळदे-शिंदखेडा रस्त्यावर एसबीआय बँकचे एटीएम आहे. आज पहाटेच्या सुमारास एका कारने आलेल्या चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. आपली ओळख पटू नये म्हणून आधी एटीएममधील सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍यावर काळा स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत आत ठेवलेली ९ लाख ९६ हजारांची रोकड चोरली. त्यानंतर चोरट्यांनी एटीएमला आग लावली. आगीत एटीएमसह दोन एअर कंडीशनर जळून खाक झाले आहेत.
घटनेची माहिती कळताच पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीच पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, शिरपूर शहर पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील, उपनिरीक्षक गणेश कुटे, एलसीबीचे सहा. पोलिस निरीक्षक विनोद खरात, असई धनंजय मोरे, पोहेकॉ. प्रकाश भावसार, प्रशांत माळी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या