नंदुरबार | दि.25| प्रतिनिधी
येथील श्रॉफ हायस्कूलच्या अर्णव पाटील व चि. प्रणिल भावसार या दोघा विद्यार्थ्यांनी आधुनिक काळातील विमान डिझाईन्स बनवून अद्भुत विश्वविक्रमी कामगिरी केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या जागतिक कीर्तीच्या पुस्तकात सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे.
पहली उडान या कार्यक्रमांतर्गत विमान प्रतिकृती बनविण्याचे प्रशिक्षण बालकांना देण्यात येते. विविध स्वरूपाचे इंजिन असलेली विमान बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना साहित्य पेटी (टूल किट) देण्यात आली होती. स्टीम ऑर्गनायझेशन म्हणजेच सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, मेकॅनिकल या तत्त्वावर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे कार्य सुरू आहे.
टिंकर टाईम नावाच्या ठाणे येथील संस्थेने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला प्रज्वलित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त विमान बनवणार्या विद्यार्थ्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या विश्वविक्रमाची नोंद घेणार्या पुस्तकात स्थान मिळवले आहे.
चि.अर्णव दिनेश पाटील व चि.प्रणिल भावसार यांनी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे टप्प्याटप्प्याने विमान प्रशिक्षणाची माहिती घेत सहा वेगवेगळ्या स्वरूपाची विमान प्रतिकृती बनवून दाखवली. या विमान बनविण्याच्या अनेक व्हिडिओचा अभ्यास स्वतः केला होता, त्यांच्या प्रतिकृतींची दखल घेत त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक जगदीश पाटील, सौ.सीमा पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका सौ.चेतना पाटील, सौ.प्रतिभा साळुंखे, गायत्री पाटील उपस्थित होते.