Friday, May 3, 2024
Homeजळगावमुक्ताईनगर तालुक्यासाठी 1 लाख 20 हजार 478 पुस्तके प्राप्त

मुक्ताईनगर तालुक्यासाठी 1 लाख 20 हजार 478 पुस्तके प्राप्त

मुक्ताईनगर Muktainagar

मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत (Free textbook plan) महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे (Department of Education) मुक्ताईनगर तालुक्याला 1 लाख 20 हजार 478 इतकी पाठ्यपुस्तके (books) शैक्षणिक वर्ष 2022 – 23 साठी प्राप्त झालेली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तका विद्यार्थ्यांना (students) देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्राथमिक शाळा तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक तसेच माध्यमिक मराठी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये (Schools) दरवर्षी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य यांचेकडून मोफत पाठ्यपुस्तक (Free textbook plan) पुरविण्यात येतात त्या प्रमाणे इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी च्या वर्गांसाठी मुक्ताईनगर तालुक्याला खालील प्रमाणे इयत्ता वार पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली आहेत

इयत्ता पहिली साठी 5 हजार 264 , दुसरी साठी 5 हजार 840 , तिसरी साठी 13 हजार 352 , चौथीसाठी 16 हजार 209 , पाचवीसाठी 16 हजार 104 , सहावी साठी 24 हजार 528 , सापने साठी 20 हजार 709 तसेच इयत्ता आठवीसाठी 18 हजार 472 अशाप्रकारे एकूण 1 लाख 20 हजार 478 इतकी पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली आहेत अशी माहिती गट शिक्षणाधिकारी (Group Education Officer) बी.डी.धाडी यांनी दिली आहे.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी बी.डी.धाडी यांचे नियोजनानुसार ,विस्तार अधिकारी राजू तडवी यांचेसह विषयसाधनव्यक्ती श्री. मालवेकर ,भोसले, नायकुजी, कांबळे तसेच विशेष शिक्षक साळुंखे,सोनवणे ,पवार पाटील,विनोद कोळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या