Monday, November 18, 2024
Homeनाशिकनाशकातून मुख्य न्यायाधीशांना जाणार 1 लाख सह्यांचे पत्र; संविधान प्रेमी गोळा करणार...

नाशकातून मुख्य न्यायाधीशांना जाणार 1 लाख सह्यांचे पत्र; संविधान प्रेमी गोळा करणार 11 दिवसात सह्या

नाशिक । फारुक पठाण

नाशिक शहरातील संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने केंद्र सरकाराच्या सिटीजन अमेंडमेंट अ‍ॅक्ट तसेच एनआरसी व एनपीआर विरोधात आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात सह्यांची मोहीम राबविण्यात येऊन एक लाख सह्यांचे पत्र देशाचे मुख्य न्यायाधीश यांना पाठविण्यात येणार आहे.

- Advertisement -

या बाबत नुकतीच हुतात्मा स्मारक येथे विशेष बैठक होऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. त्याचप्रमाणे मनपा विभागनिहाय बैठका देखील घेण्यात येत असून 2 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता चौक मंडई (जुने नाशिक) येथे नागरिकांसाठी सह्यांची मोहींम राबविण्यात येणार आहे. सुमारे 11 दिवसात 1 लाख सह्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 5 जानेवारी सायं. 5.30 वा. नाशिकरोड येथील राजराजेश्वरी चौकात, 6 रोजी शिवाजी चौक नवीन नाशिक, 7 रोजी वडाळागांव, 9 रोजी सातपूर, 10 रोजी नाशिक पश्चिम विभागात तर 11 जानेवारी 2020 रोजी पंचवटीत सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व ठिकाणी सायंकाळी 5.30 वा. आंदोलनाला सुरूवात होणार आहे.

प्रत्यक्ष भेटून व सोशल मिडियाच्या माध्यमातून संविधान प्रेमी नागरिक लोकांमध्ये आगामी ‘काळ्या’ कायद्याची माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे तरुण मंडळी आंदोलनात मोठ्यासंख्येने भाग घेत आहे. देशात सर्व ठिकाणी याबाबत आंदोलने सुरू असून नाशिकमध्येही ईदगाह मैदानावर 22 डिसेंबर रोजी मोठे आंदोलन मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले होते. आंदोलन अधिक तिव्र करण्यात येत असून आता सह्यांची माहिती हाती घेण्यात आली आहे. यासाठी राजू देसले, महादेव खोडे, संतोष जाधव, किरण मोहीते, शेख आसीफ सर, पद्माकर इंगळे निसार पटेल, अ‍ॅड. नाजीम काझी, अजीज पठाण तल्हा शेख आदी परिक्षम घेत आहे.

पाठींबा वाढतोय

केंद्र सरकार देशाच्या संविधानाला बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याने संविधान प्रेमी नाशिककरांच्या वतीने एक लाख सह्यांचे पत्र देशाचे मुख्य न्यायाधीश यांना पाठविण्यात येणार आहे. तसेच सिएए व एनआरसीमुळे होणार्‍या दुष्परिणामाबद्दल संविधान प्रेमी लोकांमध्ये सतत जनजागृती करीत आहे. यामुळे सतत आंदोलनाला पाठींबा देखील वाढत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या