Friday, May 3, 2024
Homeनगरजायकवाडीतून 10000 क्युसेकने विसर्ग

जायकवाडीतून 10000 क्युसेकने विसर्ग

अस्तगाव (वार्ताहर) | Astagav –

पाण्याची आवक पाहता तुडूंब भरलेल्या जायकवाडी धरणातून गोदावरीत 9973 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. यासाठी 27 पैकी 16 दरवाजे अर्ध्या फुटांनी

- Advertisement -

वर उचलले आहेत.

जायकवाडी धरण काल 98.62 टक्के इतके भरले होते. धरणात 11 हजार 373 क्युसेकने आवक होत असल्याने धरण तुडूंब असल्याने त्यातून विसर्ग करण्यात येत आहे. परवा रात्री 10 ते 10.30 वाजता धरणाचे चार गेट अर्ध्या फुटांनी वर करण्यात आले. त्या आगोदर 8 गेट वर करण्यात आले होते. काल सायंकाळी पुन्हा 4 गेट उघडण्यात आले आहेत. असे एकूण 16 दरवाजांतून 8384 क्युसेकने व जलविद्युत केंद्राच्या गेट मधून 1589 क्युसेक असा एकूण 9973 क्युसेकने विसर्ग गोदावरीत करण्यात येत आहे. सद्य स्थितीला द्वार क्रमांक 10, 27, 18, 19, 16, 21, 14, 23, 12, 25, 11, 26 या नदी गेटमधून विसर्ग सुरू आहे. काल सायंकाळी पुन्हा चार गेट वर करण्यात आले.

जायकवाडी जलाशयात 75.6 टीएमसी उपयुक्तसाठा आहे. तर मृतसह एकूण साठा 101 टीएमसी इतका आहे. विसर्ग 9973 इतका सुरू आहे, या व्यतिरिक्त जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून 800, उजव्या कालव्यातून 600 क्युसेकने विसर्ग सुरु होता. धरणातून एकूण बाहेर पडणारे पाणी 11 हजार 373 क्युसेक इतके आहे. काल सकाळी 6 वाजेपर्यंत मागील 24 तासांत जायकवाडीत 1.1 टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले. तर 1 जून पासून जायकवाडी जलाशयात एकूण 53.8 टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले आहे.

दरम्यान, नाशिकच्या गंगापूर धरणातून काल सायंकाळी 6 वाजता 268 क्युसेकने पुन्हा गोदावरीत नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍याच्या दिशेने विसर्ग सुरु करण्यात आला. दारणाचा विसर्ग पावसाअभावी 850 क्युसेकवर आणण्यात आला. कडवातून 424, भोजापूर मधून 476, वालदेवीतून 241 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. हे पाणी खाली नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 4035 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. या बंधार्‍यात यंदा 23 टीएमसी पाणी गोदावरीत वाहिले आहे. मागील वर्षी संपूर्ण हंगामात नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरीत मार्गे जायकवाडीला तब्बल 122 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या