Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकआजपासून दहावीची परीक्षा

आजपासून दहावीची परीक्षा

विभागात 2 लाख विद्यार्थी प्रविष्ठ; 271 भरारी पथकांची नेमणूक

नाशिक । प्रतिनिधी Nashik


इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात होत आहे. नाशिक विभागातून दोन लाख 2 हजार 627 विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. दहावीचा पहिला पेपर मराठीसह इतर विविध भाषा विषयांचा राहणार आहेत.पोलिस प्रशासनाने कॉपी विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे.

- Advertisement -


इयत्ता बारावीच्या परीक्षेपाठोपाठ दहावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. 17 मार्चपर्यंत चालणार्‍या या परीक्षेत विविध विषयांच्या लेखी पेपरला विद्यार्थी सामोरे जातील. इयत्ता बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेतगैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळ, शिक्षण विभागाने नियोजन आखले आहे.

परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची वाहतुक करणार्‍या कर्मचार्‍याच्या प्रवासावर जीपीएस ट्रॅकरद्वारे नजर राहणार असून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका देतानाचे व त्या स्विकारून कपाटामध्ये ठेवतानाचे चित्रण मोबाईलवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी बैठी पथके व 271 भरारी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे.

तसेच आवश्यकतेनुसार संवेदनशिल केंद्रांवर ड्रोन कॅमेरा व व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. परीक्षा आयोजनासंदर्भात शिक्षण मंडळाची संपूर्ण प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली आहे. तसेच शाळांकडून आसन व्यवस्थादेखील जाहीर केली जाते आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेला सामोरे जाण्यासाठी उत्साह बघायला मिळतो आहे. अभ्यास पूर्ण झाल्याने अनेकांकडून उजळणीवर भर दिला जातो आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांमुळे रहिवाशी सोसायट्यांमध्ये सध्या परीक्षामय माहोल झालेला दिसतो आहे.

परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची वाहतुक करणार्‍या कर्मचार्‍याच्या प्रवासावर जीपीएस ट्रॅकरद्वारे नजर राहणार असून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका देतानाचे व त्या स्विकारून कपाटामध्ये ठेवतानाचे चित्रण मोबाईलवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी बैठी पथके व 271 भरारी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच आवश्यकतेनुसार संवेदनशिल केंद्रांवर ड्रोन कॅमेरा व व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.

अर्धा तास आधीच राहावे लागेल उपस्थित
विद्यार्थ्यांना परीक्षावेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे. सकाळ सत्रातील परीक्षेत सकाळी साडेदहाला पहिला गजर वाजेल व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. 10 वाजून 50 मिनिटांनी उत्तरपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. अकराला प्रश्नपत्रिका वाटप केले जाईल. विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा मिनिटांचा वेळ मिळणार असल्याने सर्व प्रश्न सोडविण्याची संधी उपलब्ध असणार आहे.

दृष्टीक्षेपातून
नऊ विभागात 5,130 केंद्र
राज्यात एकूण 16 लाख 11 हजार 610 प्रविष्ठ विद्यार्थी
8 लाख 64 हजार 120 मुले
7 लाख 47 हजार 471 मुली
19 तृतियपंथीय
यंदा 2 हजार 165 विद्यार्थ्यांची वाढ
1 लाख 80 मनुष्यबळ

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...