Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रSSC Result 2024 : दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; विद्यार्थ्यांना ‘या’...

SSC Result 2024 : दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; विद्यार्थ्यांना ‘या’ संकेतस्थळांद्वारे पाहता येणार निकाल

पुणे | Pune

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात
आल्या होत्या. त्यानंतर मंगळवार (दि.२१) मे रोजी बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर करण्यात आला होता. पंरतु, दहावीच्या निकालाची (SSC Result) तारीख जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली होती. यानंतर अखेर शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

येत्या सोमवारी म्हणजेच (दि. २७ मे २०२४) रोजी दहावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाने (Board of Education) दिली आहे. तसेच दुपारी १ वाजता हा निकाल लागणार असून विद्यार्थ्यांना (Students) ऑनलाइन निकाल पाहता येईल, असेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. यंदा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागातील जवळपास १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तसेच यावर्षी दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली होती.

दरम्यान, विद्यार्थ्यांना https://mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://sscresult.mahahsscboard.in,https://results.digilocker.gov.in, https://results.targetpublications.org या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या